shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

संत गाडगे महाराजांनी कधी कुणाला आपल्या पाया पडू दिले नाही - ह.भ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
संतत्व हे आचार-विचारात दिसले पाहिजे. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी माणसाच्या सेवेत देव शोधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाचे चार आदर्श मानले, त्यापैकी संत गाडगे महाराजांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यावरून संत गाडगे महाराजांचे वेगळेपण सिद्ध होते, गाडगेबाबांनी कधी भक्तांना, ग्रामस्थांना आपल्या पाया पडू दिले नाही, पाया पडणाऱ्यांच्या पाठीत खराटा मारून स्वच्छता आणि आचरणाला महत्त्व देण्यास सुचवत असत, असे ह.भ.प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी व्यक्त केले.
   
श्रीरामपूर कांदा मार्केट परिसरातील श्रीसंत गाडगे महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथी निमित्त प्रवचन, पुरस्कार वितरण, प्रबोधक व्याख्याने आणि महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवचनात आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर बोलत होते. प्रारंभी मंदिरात आणि सभामंडपात प्रतिमापूजन करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम यांनी  मान्यवरांचा सन्मान करून समाजाच्या कार्याची आणि एकात्मतेची भावना व्यक्त केली. श्रीसंत गाडगे महाराज राज्यस्तरीय समाजप्रबोधन पुरस्कार देऊन आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. संयोजक राजेंद्र देसाई आणि दिनेश तरटे यांनी स्वागत, प्राप्ताविक करून उपक्रमाचे नियोजन केले.समाजातील ज्येष्ठांचा आणि योगदान देणाऱ्यांचा सत्कार केले. कवी राजाभाऊ नारायणे यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्य,विचारांची कविता फलकावर छापली, त्या फलकाचे अनावरण करण्यात आले.  शिवनाथ नारायणे सर यांनी त्या कवितेचे सादरीकरण केले.  आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर म्हणाले, साहित्यिक थोड्या शब्दात जीवनाचे सार सांगतात. संत समाजाचे प्रबोधन करतात. गाडगे महाराजांनी समाजाला मोठे केले. जो इतरांचे कल्याण करतो तो खरा संत होय. संतांच्या पाया पडण्यापेक्षा संतांनी सांगितलेल्या विचारांचे आचरण शुद्ध भावनेने करा, हा संत गाडगे महाराजांचा संदेश जपण्यातच त्यांना खरी मानवंदना आहे असे सांगून छान उपक्रम केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या भाषणात म्हणाले, संतांनी प्राणीहत्या, वृक्षतोड करू नका असे सांगितले. संत गाडगेबाबा यांनी प्राणीहत्या करणे हा परमेश्वराचा अपमान आहे. असे सांगितले. वृक्षवली हे देवरूप आहे. त्यांना जपा. मांसाहार करणे ही मानवी जीवनाला, विचाराला हानीकारक आहे, त्यासाठी गाडगेबाबांनी जत्रेत, धर्मविधीत प्राणीबळीला विरोध केला होता, तो आदर्श जपला पाहिजे असे मत व्यक्त केले. प्राचार्य शेळके यांनी संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंधाचे प्रसंग सांगितले. गाडगे महाराजांनी भाऊराव पाटील यांचा 'कर्मवीर' उपाधीने गौरव केला तर भाऊरावांनी गाडगे महाराजांचे नाव कराड कॉलेजला दिले. गाडगेबाबा यांनी रयतला मोठे योगदान दिले असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले यावेळी कवी बाबासाहेब पवार यांनी कविता सादर केली. यावेळी मुळा प्रवरा संचालक सिद्धार्थ मुरकुटे  माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, माजी गटशिक्षणाधिकारी कचरू बोरुडे, प्रा. शिवाजीराव बारगळ,  चांगदेव भागवत ,पत्रकार रवि भागवत, संजय भागवत , दिपकराव दळवी, पुंडलिक खैरनार, जगदिश जाधव ,चिंतामनी काळे, सुनिल जोर्वेकर, शिवाजी आहेर, रामचंद्र निकम, पोपट नलावडे,प्रविण निकम,  आकाश नलावडे, बंडु काळे,  शिवनाथ नारायणे, नितिन आदमने, रघुनाथ राऊत, शहाराम राऊत ,अशोक राऊत, एकनाथ गायकवाड, संदिप गायकवाड, गोरक्षनाथ त्रिभुवन, संजय त्रिभुवन, शेखर राऊत, चंद्रकांत अभंग, सुनिल राऊत, प्रशांत राऊत,भाऊसाहेब राऊत, संजय चव्हाण, गोरक्षनाथ अकोलकर, श्री. बर्वे, महिला भजनी मंडळ आणि समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र देसाई यांनी आभार मानले.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close