केज शहरातील शिक्षक कॉलनी भागातील कर्तबगार युवक राहुल प्रकाश मुंडे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद अपघाती निधन झाले आहे.राहुल मुंडे हा कर्तबगार युवा तरूण होता.त्याच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल मुंडे चा मोठा मित्र परिवार आहे.या सर्व राहुल च्या जिवलग मित्रांनी राहुल मुंडे प्रतिष्ठान ची स्थापना केली आहे. राहुल प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस या तरुण युवकांनी राहुल प्रतिष्ठानची स्थापना करताना व्यक्त केला होता.
याकामी त्यांना एम.डी घुले सर, सुधाकर ढाकणे सर, अशोक भैया तांदळे, गायकवाड सर, मुळे सर, सुर्यवंशी दादा सर, राजसाहेब ढाकणे, गोटू पाळवदे, वैभव केंद्रे, संदीप भुतडा, अशोक घुले, डॉ विजयकुमार धस, अशोक आंधळे , गोविंद काळे,व इतर अनेक मान्यवरांनी समर्थ साथ दिली आहे. याचाच एक भाग म्हणून आज दत्त जयंती निमित्ताने शिक्षक कॉलनी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गरजवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना वह्या व पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
सर्व प्रथम दत्त जयंती निमित्ताने पुजन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वह्या व पुस्तकाचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जाधवर मॅडम ,मुंडे मॅडम, वाघमारे मॅडम व गायकवाड सर उपस्थित होते.
राहुल मुंडे प्रतिष्ठानचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण वाघमारे, अशोक लांडगे ,समर्थ पारखे, ओम केदार ,सुनील शिंदे ,योगेश गायकवाड , ओम काळे,अजय मैंद व रुद्र तांदळे यांनी परिश्रम घेतले.