दानशुरांसह माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
बहुजन शिक्षण संघ संचलित श्रीरामपूर येथील शंभूक विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच नवे भोजनगृह साकारले जाणार आहे. माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्यासह विविध दात्यांसह वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
माजी उपनगराध्यक्ष बिहाणी यांनी १लाख रू., जसमितसिंग बतरा यांनी ५१ हजार रू., छल्लारे यांनी ११ हजार रू.ची देणगी जाहीर केली. प्रेमचंद कुंकूलोळ, दिनेश तरटे, वरूण अग्रवाल, बबनराव तागड यांनी बांधकाम साहित्य देण्याचे जाहीर केले.
आमदार हेमंत ओगले , बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते,माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी,राजेश अलघ,करण ससाणे, संजय छल्लारे यांच्याहस्ते भोजनगृहाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, प्राईड ॲकेडमीचे ज्ञानेश्वर मुरकुटे, सद्भभावना समितीचे ॲड. समिन बागवान, कामगार नेते जीवन सुरुडे, परिवर्तन फाउंडेशनचे मेजर कृष्णा सरदार, मराठा सेवा संघाचे नवनाथ अकोलकर, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त बबनराव तागड, दत्तनगर ग्रामपंचायतीचे सूत्रधार प्रेमचंद कुंकुलोळ, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे मिलिंदकुमार साळवे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव बचुटे, नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष कैलास खंदारे, बामसेफचे रमेश मकासरे, साहित्यिक डॉ. सलिम शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड.संघराज रुपवते व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन यशस्वी माजी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थी व मान्यवरांनी भोजनगृह बांधकामासाठी सुमारे पाच लाख रूपयांची देणगी जाहीर केली. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त ॲड. संघराज रुपवते यांनी बांधकामास लागणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम संस्थेच्यावतीने देण्याची घोषणा केली. वसतिगृहाचे अधीक्षक अशोक दिवे, सिद्धार्थ दिवे, कविता दिवे व त्यांच्या परिवाराने घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे कौतुक करीत त्यांना रूपवते यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमास संजय दुशिंग, ॲड.अण्णासाहेब मोहन, राजेंद्र हिवाळे, प्रा.सुनिल वाघमारे,दिनेश तरटे, राजू धामोने, रवि पंडित, साजिद शेख, अतुल देसरडा, रामभाऊ सुगुर, फ्रांन्सिस शेळके, अमोल सोनवणे, ससकर सर, गोपाळे सर,चोभेसर अकबर शेख, संतोष त्रिभुवन, शुभम जाधव यांच्यासह पुणे, नगर, नाशिक आदी ठिकाणाहून आलेले आजी माजी विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वसतिगृहाचे अधीक्षक अशोक दिवे यांनी सूत्रसंचालन केले. सिध्दार्थ दिवे यांनी आभार मानले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111