shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

घरपट्टी पाणीपट्टी प्रश्नावर देवळाली प्रवरा येथे सर्वपक्षीय बैठक संपन्न..

आंदोलनावर नागरीक ठाम.

देवळाली प्रवरा - दि.२७/१२/२४
देवळाली प्रवरा नगरपरिषदेने वाढवलेली अन्यायकारक घरपट्टी रद्द करण्यासाठी व पाणीपट्टी कमी करण्यासाठी देवळाली प्रवरा शहरात मालमत्ताधारकांची आज नगरपालिकेसमोरील मारुती मंदिरामध्ये बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री तसेच नगर विकास मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देवळाली प्रवरा नगरपालिकेची घरपट्टी मनमानी पद्धतीने वाढविण्यात आल्याबद्दल वस्तू स्थिती समोर आणावी व सर्वपक्षीय आंदोलन उभारण्यात यावे असे या बैठकीत सर्वांनुमते ठरविण्यात आले. 

    या बैठकीस आप्पासाहेब भिमराज ढूस, ललित धनराज चोरडिया, दीपक नानासाहेब पठारे, कृष्णा नानासाहेब मुसमाडे, जयेश सुखदेव मुसमाडे, प्रशांत रामचंद्र काळे,  शशिकांत गजानन देशमुख, बाळासाहेब कुशाबा कदम,  सुनील वसंत खुरुद , प्रकाश वाकळे, चंद्रकांत कराळे, नानासाहेब उंडे , इमरान शेख, लालाभाई शेख, अशोक शिंदे, हर्षल चोरडिया, प्रभाकर कांबळे, शरद खांदे आधी विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. 
       प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष ललित धनराज चोरडिया तसेच  आप्पासाहेब ढूस, कृष्णा मुसमाडे, जयेश मुसमाडे, चंद्रकांत कराळे, भास्कर उंडे, लालाभाई शेख, दीपक पठारे, बाळासाहेब कदम, शशिकांत देशमुख आदींनी चर्चेत सहभाग घेऊन देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या घरपट्टी पाणीपट्टी बाबत लढा उभारण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करून लढा देण्याचे व लोक जागृती करुन आंदोलनात लोकसहभाग वाढविण्यास भर देण्यावर सर्वांचे एकमत झाले.
      बैठकीचे प्रस्ताविक आप्पासाहेब ढूस यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत कराळे यांनी केले.
close