shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शितल अकॅडमीची राज्यस्तरीय स्पीकिंग स्पर्धा संपन्न.

 धरणगाव प्रतिनिधी:शितल अकॅडमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा नुकतीच टायगर इंटरनॅशनल स्कूल, पारोळा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील शितल अकॅडमीच्या २५ शाखांमधून एकूण ३,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. प्राथमिक फेरी शाखास्तरावर घेण्यात आली, त्यानंतर प्रत्येक शाखेतून तीन विद्यार्थी राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी निवडले गेले.  

शितल अकॅडमीची राज्यस्तरीय स्पीकिंग स्पर्धा संपन्न.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, लोकमतचे प्रतिनिधी भूपेंद्र मराठे, पारोळा भूषण संपादक भिका चौधरी, दिव्य मराठीचे प्रतिनिधी अभय पाटील, पुण्यनगरीचे प्रतिनिधी रमेश जैन, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी जबाबदारी पार पाडली.  

अंतिम फेरीत पिंपळनेर शाखेचा आयुष अहिरराव हा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला, त्याला ११,१११ रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांकावर गुंजन शेवाळे असून तिला एल.ई.डी. टीव्ही, तर तृतीय क्रमांक गायत्री थोरात हिला सायकल व सन्मानचिन्ह देण्यात आले.  

          बेस्ट स्पीकर पुरस्कार:

प्रत्येक शाखेमधून बेस्ट स्पीकर म्हणून खालील विद्यार्थ्यांना ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले:  

पारोळा: धनश्री महानुभव  

कासोदा: कोमल पाटील  

एरंडोल:जानवी महाजन  

पिंपळनेर: रिशिता अकलाडे  

धुळे: सुयश गायकवाड, मनीष पाटील  

चांदवड: मृण्मयी कासार, मनोज शेवाळे  

नंदुरबार: ओजस्वी चौधरी, राकेश महिरे  

तळोदा: मानवी गिरासे  

धरणगाव: मृणाल भावसार  

पाचोरा: दिशांत मनोरे  

मालेगाव: निकीता शेलार  

देवळा:  प्रांजल अहिरे  

              व्यवस्थापन:

स्पर्धेचे यशस्वी आयोजन शशिकांत महाजन, विजय पाटील, रवींद्र पाटील, व अन्य संचालकांनी केले. प्राचार्य मंगेश पवार व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जीवन मोरे यांनी केले.  

ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वकृत्व कौशल्याला वाव देणारी व प्रेरणादायी ठरली.

close