पथनाट्याव्दारे बाळ येशू
देखाव्यांचे सादरीकरण
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील हरिगांव येथील संत तेरेजा चर्च (मतमाउली भक्तिस्थान) येथे सालाबादप्रमाणे नाताळ सणानिमित्त गावातून भव्य कॅण्डल [मेणबत्ती] मिरवणूक काढण्यात आली त्यात असंख्य भाविक तसेच प्रमुख धर्मगुरू रे.फा डॉमनिक रोझारिओ, फा.संतान रॉड्रीग्ज,,फा. फ्रान्सिस ओहोळ,आदी हातात मेणबत्ती घेऊन मिरवणूकीत सहभागी झाले होते. यावेळी विविध ठिकाणी पथनाट्याव्दारे देखावे बाल कलाकारांनी सादर केले.
याप्रसंगी प्रमुख धर्मागुरु फा डॉमनिक यांनी सांगितले की, आज आज ख्रिस्त जयंतीच्या या पवित्र आठवड्यामध्ये प्रबोधनपर आज शांती मिरवणूक आज सायंकाळी ६ वा.प्रारंभ झाली.आणि या मिरवणूकीव्दारे बाळ येशूच्या शांतीचा संदेश संपूर्ण समाजाला देण्यात येण्याचा आमचे कर्तव्य आहे.आगदी बाळ येशूच्या जन्माचा देखावा सर्व ठिकाणी गावात सादर करून त्यानुसार बाळ येशूच्या प्रेमाची दयेची व समजंसपणाची ही कृती सर्वत्र पसरवावी व बाळ येशूच्या तारणदायी या संदेशची शुभवार्ता पूर्ण जगाला पसरवावी हा उद्देश आहे.पथनाट्याचे सूत्र संचालन शिल्पा पठारे यांनी उत्कृष्टपणे सादर केले.
दि ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वा पवित्र संगीत मिस्सा,व नूतन वर्षाच्या १ जानेवारी रोजी सकाळी ८ वा पवित्र मिस्सां आयोजित करण्यात आले आहेत त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111