shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांचा भारतीय खेळाडूंना दबावात आणण्याचा प्रयत्न


                 सध्या टिम इंडिया अतिशय महत्वाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. सुरूवातीच्या तीन सामन्यांअखेर भारताचे पुढील आव्हान जीवंत असल्याने व गाबा कसोटी कांगारूंचे मनसुबे पुरते उधळल्याने ऑस्ट्रेलियन संघ, माजी खेळाडू, पत्रकार, सोशल मिडिया, प्रसारमाध्यमे व प्रेक्षकवर्ग यांचे पित्त खवळले आहे. या साऱ्या समुहाला पक्के ठाऊक आहे की टिम इंडिया आता मागे बघणार नाही. झाल्या चुका दुरूस्त करून कांगारूंना कोपऱ्यात घेवून ठोकून तर काढेलच, परंतु बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबरोबरच डब्ल्यूटीसी फायनलचे तिकीट स्वतःसाठी बुक करेल. या एकाच गोष्टीने त्यांच्यात खळबळ उडाली असून त्यामुळे ते कोणत्याही स्तराला जाऊन भारतीय संघाला पर्यायाने प्रमुख खेळाडूंना हेरून त्रास देऊन त्यांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.


                कोणत्याही वाद विवादाविना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका होणे शक्य नाही.  मोहम्मद सिराज आणि मार्नस लाबुशेन - ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वादात ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय गोलंदाजावर बरीच टीका केली होती.  मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाडूची बाजू घेत ऑस्ट्रेलियन मीडियाचे दावे खोटे ठरवले.  आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.  ही तीच ऑस्ट्रेलियन मीडिया आहे, जी विराट कोहलीची मालिका सुरू झाली आणि टिम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली तेव्हा त्याच्यावर स्तुतीसुमने लिहित होती.  आता मेलबोर्न विमानतळावर विराटने महिला पत्रकाराशी केलेल्या वादानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाचे आणखी एक लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे.  त्याने विराट कोहलीसाठी 'बुली' हा शब्द वापरला आहे.  प्रस्तुत लेखात या प्रकरणाबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊ या...

                वास्तविक, ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या समाप्तीनंतर भारतीय संघ १९ डिसेंबरला मेलबोर्नला पोहोचला.  ऑस्ट्रेलियन पत्रकार त्याच्या परवानगी शिवाय कोहलीच्या मुलांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते.  कोहलीला त्याचे वैयक्तिक आयुष्य लाइम लाइट पासून दूर ठेवणे आवडते.  यामुळेच त्याने अनेकदा पत्रकारांना वामिका आणि अकाय या मुलांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना घेरल्यामुळे विराट खूश नव्हता.  ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी त्याला आणि त्याच्या मुलांना विमानतळावर कॅमेऱ्यात कैद केल्याचे पाहून कोहलीला राग आला.  या वस्तुस्थितीवर तो एका महिला टीव्ही रिपोर्टरशी तणावपूर्ण संभाषण करताना दिसला.

               आपल्या गोपनीयतेचा आदर केला जात नसल्याचे त्याने सांगितले.  व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणतोय, 'मला माझ्या मुलांसोबत थोडी गोपनीयता हवी आहे.  मला विचारल्या शिवाय तुम्ही चित्रफित करू शकत नाही.  त्यानंतर कोहलीने पत्रकाराला मुलांचे फोटो हटवण्यास सांगितले.  मात्र, ऑस्ट्रेलियन मीडियाने काहीही रेकॉर्ड केले नसल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर तो पत्रकारांशी हस्तांदोलन करून पुढे जाताना दिसला.  आता मेलबोर्न विमानतळावर घडलेल्या घटनेवरून ऑस्ट्रेलियन 'नाईन स्पोर्ट्स'च्या पत्रकारांनी कोहलीला लक्ष्य केले आहे.  त्याने कोहलीला 'गुंड' म्हटले आणि त्याच्यावर एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोपही केला.  ती महिला पत्रकारही नाईन स्पोर्ट्सची रिपोर्टर आहे.

                 डेली मेलने नाइन स्पोर्ट्स पत्रकार जोन्सच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'नॅट इओआनिडीस तेथे कॅमेरामनसोबत होते, चॅनल सेव्हनचा रिपोर्टर त्याच्या कॅमेरामनसोबत होता आणि ते आम्ही दररोज जे करतो तेच करत होते.  आम्ही विमानतळावर खेळाडूंच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करत होतो.  राजकारणी असोत, खेळाडू असोत किंवा कोणीही असो, आपण नेहमी असेच करतो.  मात्र, याचा विराटला राग आला.  कॅमेरा त्याच्यावर फोकस झाल्याचा त्याला राग आला.


                   जोन्स म्हणाला, 'ठीक आहे, तू फलंदाजी करणारा सुपरस्टार आहेस, तू क्रिकेट जगतातील ग्लोबल सुपरस्टार आहेस आणि कॅमेरा तुझ्यावर फोकस झाला म्हणून तुला राग आला ?  मी फुटेज पाहिल्यावर, दोन कॅमेरामन आणि चॅनल सेव्हनच्या रिपोर्टरसह तेथे उपस्थित असलेल्या इतर तीन लोकांकडे तो वळला आणि म्हणाला, "तुम्ही ठीक आहात का ?"  खरेतर, विराट हा अतिशय कठोर माणूस आहे.  पाच फूट एक इंच उंच असलेल्या महिला पत्रकार नाटे यांच्यासमोर तुम्ही तिला शिवीगाळ केली.  तू (विराट) धमकावणारा माणूस आहेस.

                ऑस्ट्रेलियन मीडियाची ही पहिली कारवाई नाही.  यापूर्वी याच मालिके दरम्यान त्याने यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा यांच्यावरही निशाणा साधला होता.  मिचेल स्टार्कसोबत झालेल्या संघर्षामुळे ऑस्ट्रेलियन मीडियाने यशस्वीला लक्ष्य केले होते.  त्याचवेळी शनिवारी पत्रकार परिषदेत जडेजा इंग्रजीत न बोलल्याने ऑस्ट्रेलियन मीडिया संतापला.  त्याने जडेजावर अनेक खोटे आरोप केले होते.  यापूर्वी २०२०-२१ मध्ये देखील ऑस्ट्रेलियन मीडियाच्या अशाच कारवाया झाल्या होत्या.  त्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी सिराजसाठी 'वर्म' हा शब्द वापरल्याचा बचाव केला.  एवढेच नाही तर त्यांनी भारतीय सघांसोबत कोरोना संक्रमण काळात क्वारंटाईनबाबत बराच गदारोळ केला होता. खेळाडूंना दहा दहा मजले चढून उतरून स्वतःचे सामान स्वतःच न्यायला लावले जात होते. लिफ्टचा उपयोग करू दिला जात नव्हता. इतकी मानहानी सहन करत टिम इंडियाने ऑस्ट्रेलियाची घमंडपुरती उतरवली होती व आताही ती वेळ आली असून झाल्या अपमानाचा बदला घेऊन टिम इंडिया कांगारूंना मेलबोर्न व सिडनीला धुळ चारण्याचे सारे हत्यारे घेऊन उतरणार व त्यांची जागा त्यांना दाखविणार हे नक्की ! मागील दोन दोन दौऱ्यात ऑस्ट्रेलियन लोकांनी हाच फंडा वापरला होता त्यावेळीही तो त्यांच्या अंगलट आला होता. त्यातून त्यांना कोणताही बोध घेता आला नाही. हे त्यांचे खऱ्या अर्थाने दुर्देवच म्हणावे लागेल.

                 भारत हा आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना देव मानतो. म्हणूनच ' अतिथी देव भव ' हि म्हण भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलीत आहे. आपल्याकडे आलेला पाहुणा मा तो दुश्मन जरी असला तरी आपण त्याचा यथायोग्य सन्मान करतो. भारतीय पत्रकार एक वेळ आपल्या खेळाडूंना प्रसिध्दी देणार नाहीत पण विदेशी खेळाडूंचा आदर पूर्वक योग्य सन्मान करतात. आयपीएलमध्ये मध्ये याच ऑस्ट्रेलियन खेळांडूचा करोडो रुपये देऊन माज वाढवतो. एवढ्या मोठ्या रकमा त्यांना विनासायास दिल्या जातात. त्याच्या बदल्यात ईमानदारीने ते खेळतही नाहीत. आता मात्र त्यावर लगाम घालण्याची वेळ आली आहे. सर्व आयपीपीएल फ्रँचाईजी व बीसीसीआयने यावर ठोस भूमिका व निर्णय घेऊन यांची कमाल किंमत तीन कोटींच्यावर जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. तेंव्हाच यांची गर्मी थंड होईल.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close