श्रीरामपूर / प्रतिनिधी:
तालुक्यातील नाऊर येथील
सद्गुरु गंगागिरी विद्यालयात इयत्ता ८ वी ते १० वी च्या किशोरवयीन मुलींसाठी विशेष समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाचा उद्देश मुलींना सामाजिक संबंधांची जाणीव करून देणे, स्वतःचा बचाव करण्याचे महत्त्व समजावणे आणि सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे धोके पटवून सांगणे हा होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.ए.जे. केकाण यांनी केले आणि या उपक्रमाची गरज स्पष्ट केली.विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आर.एम.तांबे (सर) यांनी किशोरवयीन वयातील आव्हानांवर प्रकाश टाकत योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिरसाठ (सर) यांनी केले.
सामाजिक संबंधांवर चर्चा:
ज्येष्ठ शिक्षिका एस.एम. वाव्हळ मॅडम यांनी सामाजिक नातेसंबंधांचे महत्त्व समजावत सकारात्मक नाते निर्माण करण्यासाठी संवाद आणि सहकार्याचा उपयोग कसा करावा यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
स्वतःच्या बचावाचे मार्ग:
श्रीमती एस.टी.कवाडे मॅडम यांनी मुलींना शारीरिक आणि मानसिक सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देत, संभाव्य त्रासांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय सुचवले.
सोशल मीडियाचा प्रभाव:
श्रीमती डी.ए.शिंदे मॅडम यांनी सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर सखोल चर्चा केली. किशोवयीन कालावधीत नकळत सोशल मीडियाचा वापर झाल्यास आलेल्या समस्यांवर पालक किंवा विश्वासार्ह व्यक्तींशी चर्चा करण्याचे महत्त्व नमूद केले.
कार्यक्रमाने उपस्थित मुलींमध्ये आत्मविश्वास व सजगता वाढल्याचे स्पष्ट दिसून आले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन मिळत राहिल्यास त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांनी दिली.
*वृत्त विशेष सहयोग
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111