वाशिम / प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रमुख निलेश सोमाणी यांच्या मातोश्री स्नेहलता सोमाणी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.काल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे यांनी शनिवारी जानकी नगर सोमाणी सदन वाशिम येथील निवासस्थानी भेट देऊन सोमाणी परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी निलेश सोमाणी, , यांच्यासह महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलिक वाळेकर, वाशिम जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख, रिसोड तालुकाध्यक्ष अरुण क्षिरसागर,तालुका सरचिटणीस नारायणराव आरु. जिल्हा सेलचे अध्यक्ष केशव गरकळ, महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे रिसोड तालुका सदस्य अशोक चोपडे, धैर्यशील जोशी. डॉ राम रंजवे. गजानन गाडे. आदी उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111