shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विद्यानिकेतन स्टेट बोर्डचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन टाईमलेस ओडिसी- कालचक्रचा प्रवास या मार्मिक, वैचारिक विषयावर आधारित नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मिस इंटरनॅशनल इंडिया- सौंदर्यवती रश्मी शिंदे, अमेरिकास्थित रोहित शिंदे, विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, खजिनदार राजीव शिंदे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे होत्या.

       प्रसंगी इ.नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी काळाला गवसणी घालत, आपल्या बहारदार  नृत्याविष्कारांतून    कालचक्रच्या नाट्यमय प्रवासाचा वेध घेतला. तसेच या संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांनी आपला भूतकाळ, भविष्यकाळ जाणून घेतला. व बदलत्या कालचक्रावर प्रकाशझोत टाकला. दरम्यान चि.पार्थ मुळे,गौरव गोसावी, साईराज गायकवाड या विद्यार्थ्यांनी टाईम मशीनच्या प्रतिकृतीद्वारे आपल्या वैचारिक संभाषणातून कालचक्राचा अवघा नाट्यमय प्रवास विद्यार्थी, श्रोत्यांसमोर उलगडला. 
यावेळी बदलत्या कालचक्र प्रवासानुसार वार्षिक स्नेहसंमेलनात प्रायमरी डान्स,अर्ली ह्युमन्स, मोहेंजोदडो, कार्टून वर्ल्ड, एलियन,घोष्ट स्टोरी, चाईल्डहुड,बॉलीवूड, फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र, कारगिल,मुंबई परफॉर्मन्स, वारी, बुद्धा, डॉक्टर्स चाईल्डहुड, जालियनवाला बाग, वैदिक पिरेड,चाणक्य अँड चंद्रगुप्ता, छत्रपती शिवाजी महाराज, फ्युचर २५०, फ्युचर २५००, फायनल मिक्स सॉंग या ओघवत्या जीवन शैलीतील नृत्य-गीतांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या मनोवेधक नृत्यांनी रसिक- प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
         प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कु. संजीवनी गाडेकर, चि.रुद्र ढमाले या विद्यार्थ्यांना या वर्षीचा स्टुडन्ट ऑफ द ईयर हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय स्पर्धेत  उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु.तनिष्का राऊत, चि.सार्थक सोलंकी, राज बारहाते यांनाही सन्मानित करण्यात आले. दरम्यान मागील वर्षी माध्यमिक शालांत परीक्षा इ. दहावीमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमधून कु.आदिती तांबे,दिशा राऊत,साक्षी सिनारे,मयुरी उंडे या विद्यार्थिनींचा गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित शिक्षक-पालक प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला. शेवटी मान्यवरांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कठोर परिश्रम घेतले.
         प्रसंगी कार्यक्रमास विद्यालयाचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधीज्ञ भागचंद चुडीवाल,प्रकाश निकम पाटील,सुखदेव सुकळे, संजय शहा, मंगलाताई आढाव,शुभांगी देवकर, डॉ.अर्चना शेळके, विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे,योगेश गायकवाड, वर्षा धामोरे,चित्रा सुरडकर, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे,अमित त्रिभुवन कार्यालयीन अधीक्षक सतीश थोरात,रावसाहेब रशिनकर, सुनील ठाणगे, शिक्षक- पालक प्रतिनिधी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका प्रीती नानेकर,सूत्रसंचालन कु.अनन्या राकेचा हिने केले, तर आभार कु.अक्षदा दळे हिने मानले.

*वृत्त विशेष सहयोग*
शंकर बाहुले (सर) श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close