shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार शिवाजी काळभोर यांना प्राप्त.


लोणी काळभोर : ग्रीन फांऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका येथील निवेदक शिवाजी काळभोर  यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण नाना काळभोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

    शिवाजी काळभोर हे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ज्यानी आपल्या भाषण शैलीतून ओळख निर्माण केली असे व्यक्तीमत्व लोणी काळभोर परिसरात आदर्श निवेदक  व आदर्श शेतकरी असे संबोधले जाणारे शिवाजी काळभोर यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट निवेदक पुरस्कार देण्यात आला.
     यावेळी पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गवळी सर ,कन्या प्रशाला लोणी काळभोर मुख्याध्यापक संजिवनी बोरकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, सरपंच सविता लांडगे, उपसरपंच रत्नाबाई वाळके, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर चे संचालक योगेश काळभोर, शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष भोसले रत्नाबाई काळभोर, महिला दक्षता कमिटी अध्यक्ष संगीता काळभोर, ग्रीन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रतीक कोळपे, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, सोशल मीडिया अध्यक्ष गहिनीनाथ राजे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
close