अहिल्यानगर / प्रतिनिधी:
अल्पसंख्यांक समाजाच्या समस्यांविषयी शासन सकारात्मक असून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, महानगरपालिका उपायुक्त प्रियंका शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे, अल्पसंख्याक समाज प्रतिनिधी यश शहा, हरजितसिंग देवेंद्रसिंग वधवा, सय्यद वहाब व सय्यद अफजल अब्दुल कादर आदी उपस्थित होते.
जिल्हा अल्पसंख्यांक समितीची दर तीन महिन्यांतल्या पहिल्या मंगळवारी बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचना करीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितीत अल्पसंख्याक प्रतिनिधींकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्पसंख्याक समाजाच्यावतीने उपस्थित प्रतिनिधींनी अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्या व समस्यांबाबत मते मांडली.
बैठकीला अल्पसंख्यांक विभागाच्या योजना राबविणाऱ्या विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111