अजीजभाई शेख / राहाता
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक नुकताच बाल आनंद मेळावा संपन्न झाला.
प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गासाठी बाल आनंद मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधीर म्हस्के यांचे हस्ते झाले. यावेळी प्र. प्राचार्य संजय ठाकरे आणि सुधीर म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य अलका आहेर, प्र. मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, प्र. पर्यवेक्षक अनिल जाधव, डॉ. शरद दुधाट, देवेश आहेर, महेश वाकचौरे, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह महिला पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी रानातील विविध पालेभाज्या, फळे, कंदमुळे, भेळपुरी, पाणीपुरी आदी खाद्यपदार्थ आणि पालेभाज्या व फळभाज्यांचे स्टॉल लावण्यात होती. या आनंद मेळाव्याचे प्रास्ताविक व स्वागत शुभांगी भारसाकळ यांनी केले तर आभार नरेंद्र ठाकरे यांनी मानले. सूत्रसंचालन अश्विनी सोहोनी यांनी केले. हा बाल आनंद मेळावा संपन्न होण्यासाठी शुभांगी भारसाकळ व मुले व कन्या विद्यालयातील शिक्षिका, शिक्षक, विदयार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111