shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

प्राचार्य अंगद काकडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान


अजिजभाई शेख/ राहाता 
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंगद काकडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच संपन्न झाला. 
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एस. पी. लवांडे होते. तर अध्यक्ष रावसाहेब म्हस्के होते. सुरुवातीला प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य लवांडे, अध्यक्ष रावसाहेब म्हस्के व इतर मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य अंगद काकडे व छाया काकडे यांचा शाखेच्यावतीने सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य अंगद काकडे यांनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेट दिले. तसेच विद्यालयासाठी हार्मोनियम पेटी भेट दिली. याप्रसंगी देवेश आहेर, नरेंद्र ठाकरे, बाळासाहेब ढोमसे, प्रमोद तोरणे, दिलीप ढवळे, विनायक राऊत, मधुकर पवार, ॲड. रोहिणी शिंदे, प्रा.अनघा काकडे, प्रा. अजिंक्य काकडे, मुख्याध्यापिका छाया काकडे, ए. यु. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य अंगद काकडे यांनी आपल्या संस्थेतील प्रदीर्घ सेवेत सहकार्य केलेल्या सहकारी शिक्षकांबद्दल आणि रयत शिक्षण संस्थेबद्दल मनापासून ऋणनिर्देश व्यक्त केले. प्राचार्य डॉ. लवांडे व अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांनी उभयतांना शुभेच्छा दिल्या. या समारंभासाठी एकनाथ घोगरे, डॉ. सुनील नरके, अण्णासाहेब मांजरे, दत्तात्रेय सोले, दिलीप ढवळे, सुनील वारे, जितेंद्र शिंदे, अण्णासाहेब साबळे, हरिभाऊ चौधरी, मधुकर जाधव, एकनाथ शिंदे, दिलीप भोसले, अलका आहेर, सुभाष भुसाळ, अक्षय काकडे, प्रमोद काकडे, माजी मुख्याध्यापक त्रिभुवन सर, मुख्याध्यापक रकटे सर, रतिलाल भंडारी, चंदूभाई तांबोळी, सद्गुरु कात्रजकर, मुख्याध्यापक देवराम वडीतके, विष्णू हाडोळे, राहुल चांदगुडे, मुख्याध्यापिका सौ. शिरसाठ, माजी मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, सतीश पठाडे, सुरेश खंडीझोड, बाबासाहेब अंत्रे आदींसह शिक्षक, नातेवाईक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. शरद दुधाट यांनी मानले. तर सूत्रसंचालन अश्विनी सोहोनी व रेणुका वरपे यांनी केले.

*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
close