कर्जत / प्रतिनिधी:
कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे पहिल्या स्त्रीशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध स्त्रीशिक्षिकांना पुरस्कार घोषित झाला, त्यामध्ये एक ज्ञानतपस्वी आणि प्रतिभाशाली साहित्यिका प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे यांना ताराबाई शिंदे पुरस्कार घोषित झाला, हा योग्य ज्ञानगौरव असल्याचे उद्गार कवयित्री संगीता फासाटे यांनी काढले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, स्नेहग्रुप परिवार आणि मित्रमंडळातर्फे प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे यांचा अभिनंदन पूर्वक सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी कवयित्री संगीता फासाटे बोलत होत्या. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक योगदानाचे मोठेपण सांगितले. स्नेहपरिवार ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य टी. ई. शेळके, माजी गटशिक्षणाधिकारी के.पी. बोरुडे, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, माजी नायब तहसिलदार नरेंद्र पेटकर, डॉ.मनिषा मोकाटे- पोखरकर, डॉ. नंदा काळे- वर्पे, डॉ.ज्योती चव्हाण- पादर,अशोकराव कटारे, डॉ. दुर्गा म्हस्के आदिंनी प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांचे अभिनंदन करून स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनातील निवडीबद्दल कौतुक केले, संगीता फासाटे म्हणाल्या, कर्जत येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ०३ जानेवारी २०२५ रोजी स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनात प्राचार्या डॉ. कोकाटे यांचा सन्मान होत आहे, हा सर्व स्त्रीशिक्षिकांना मिळणारा सन्मान प्रेरणादायी असल्याचे सांगून संयोजकांचे आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111