shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शारदा शाळेच्या क्रीडा महोत्सवाचे सांघिक विजेतेपद गिरलायन्स संघाने पटकाविले

फुकटे,सोनवणे,गिरमे व आहेर स्पर्धेतील सर्वोत्तम क्रीडापटू

कोपरगाव / प्रतिनिधी:
येथील सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आठ दिवस रंगलेल्या क्रीडा महोत्सवाची आज उत्साहात सांगता झाली.
वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष पाटणकर व श्री दिलीप चाफेकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे तसेच शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे,सौ. पल्लवी ससाणे, सौ. नैतीलीन फर्नांडिस आदींच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली आणि त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वागत गीताने सर्वांनी भरभरून दाद दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री सुभाष पाटणकर यांनी वार्षिक क्रीडा महोत्सव  २०२४ आयोजित केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्य आणि शिक्षकांकडून शिकावे आणि प्रत्येक कार्य पूर्ण करण्याचे ध्येय ठेवावे,असा सल्लाही त्यांनी दिला,जे विद्यार्थी खेळात चांगले असतात ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिक उंची गाठू शकतात.
यावेळी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, वार्षिक क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना समर्पित केले आणि खेळाचे महत्त्व सांगितले, शिस्तीने कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करता येते.भीती काढून टाकणे,एकत्रितपणे काम करणे, दबाव व्यवस्थापित करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करून आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या व हा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४ यशस्वी करण्यासाठी सर्वांचे आभार मानले. तसेच खेळामध्ये शिस्त ही सर्वात महत्वाची असल्याचे सांगून क्रीडा महोत्सवातील सर्व स्पर्धक विजेते असल्याचे सांगून सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.
वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ, टेबल टेनिस,थ्रो बॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, खो-खो तसेच वैयक्तिक खेळामध्ये भालाफेक, गोळा फेक, थाळीफेक,१०० मी धावणे, २०० मी धावणे, ४०० मी धावणे व ४×१०० रिले रेस ज्यामध्ये सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. क्रीडा महोत्सव मध्ये प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी पोटॅटो रेस,थ्री लेग ऍड्रेस रेस, ऑफट्रॅकल रेस,लेमन स्कूल आधी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. 
सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सन २०२४-२५ चे शारदा क्रीडा महोत्सवाचे विजेतेपद गिरलायन्स संघाने पटकावले.
तसेच हर्षद फुकटे,परी गिरमे, सार्थक सोनवणे व अनामिका आहेर यांनी सर्वोत्कृष्ट क्रीडापटू होण्याचा मान पटकावला.सर्व क्रमांक प्राप्त खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वी करण्याकरीता शाळेचे सर्व शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी आदींनी अथक परिश्रम घेतले.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close