*सुधारणा न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करणार- वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय सदस्य तथा प्रदेश महासचिव प्रा.किसन चव्हाण यांचा इशारा*
शेवगांव / प्रतिनिधी:
येथील शासकीय रुग्णालयात कमालीची उदासीनता दिसून येत असून अनेक सुवेधेच्या अभावामुळे रुग्णांसह तालुकाभरात मोठा संताप व्यक्त केला जातो आहे. याबाबत दि.१२-१२-२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगांव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने तालुक्यातील रूग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा सोमवार दि. ३०-१२-२०२४ रोजी बोंबाबोंब आंदोलन आंदोलन करणार असलेबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले होते, त्यामुळे आज दि. ३०-१२-२०२४ रोजी शेवगाव शहर व तालुक्यातील अनेक कुटुंब प्रमुख व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे नव्याने रुजू झालेल्या डॉ दर्शना धोंडे (बारस्कर) यांच्या समक्ष समस्या बाबत पाढाच वाचला, त्यावर या सर्व मांडलेल्या समस्या सोडवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, शहराध्यक्ष पप्पू गर्जे, प्रमोद गजभीव,राजुशेठ आहुजा, संघटक शेख सलीम जिलाणी, रवींद्र निळ, दिलीप वाघमारे, संदिप नरवडे (पेन्टर), विनोद घाडगे भिमा गायकवाड, संदिप घाडगे, अरविंद साळवे , भारस्कर कृष्णा, व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व म्हणाले की ज्या समस्या, तक्रारी, रूग्णांच्या , वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारींच्या आहेत त्या बाबत सुधारणा न झाल्यास पुढील काळात शेवगाव ग्रामीण रुग्णालय समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
*वृत विशेष सहयोग
पत्रकार पांडुरंग गोरे - शेवगाव
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111