शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
शिर्डी शहरातील एक नामांकित, हसतमुख, दिलखुलास आणि सेवाभावी व्यक्तिमत्व, श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सेवा बजावत असलेले सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ आदरणीय डॉ. श्री. देवरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.
सन्माननीय देवरे सर हे शिर्डीला आणि साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ला लाभलेले एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. आपल्या कामाचे असलेले प्रचंड कौशल्य, गोर गरीब रुग्णांच्या बाबतीत असलेली करुणा, पराकोटीचा असलेला सेवाभाव हे सन्माननीय सरांना विशेष बनवतात. त्याचे असलेले महत्व अधोरेखित करतात. समाजात वैद्यकशास्त्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि त्या अनुषंगाने डॉ. देवरे यांच्यासारखे कर्मयोगी त्याला सर्वोतोपरी न्याय देत असल्याने मनस्वी समाधान आहे. कोणताही अभिनिवेश न बाळगता, समाजासाठी झटणारे, हजारो लोकांचे जीव वाचवणारे आणि प्राणपणाने सेवा देणारे डॉ. देवरे सर हे आम्हाला देवदूतच वाटतात. तेव्हा अश्या देवदूताचे सन्मान करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. तेव्हा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे सत्कार व सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सरांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक-महेमुदभाई सय्यद अध्यक्ष दादाभाई नामदार हाजी शमशुद्दीमभाई, अशरफभाई सय्यद,बरकतभाई सय्यद, साजिदभाई शेख, जावेदभाई शाह,पापा भाई शेख,फईम शाह, आयन शाह,अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.