नगर / प्रतिनिधी:
मस्साजोग केज बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेचा जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर कडून जाहीर निषेध करण्यात आला,तथा संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे. करण्यात आली आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत, उपाध्यक्ष शोभा भालसिंग, तालुका अध्यक्ष सुरेखाताई कडूस, सचिव वंदना नीगुट, शिलाताई शिंदे,अंमल सासे, सुरेखा सांगळे, स्वाती शेटे पाटील, राजेश्री वणी आदी उपस्थित होते.
सदरील हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या हत्येमागे एक मोठी बलाढ्य शक्ती आहे. ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे.या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर समाजाचा पोलीस यंत्रणेवरील व न्यायपालिकेवरचा विश्वास संपून जाईल असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने तहसीलदारां मार्फत निवेदना द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111