shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलाचीआवश्यकता - अनंत पाटील


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
मानवी विकासासाठी शिक्षण हे एक मुख्य साधन असून, त्यामुळेच आज शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी डिपॉल इंग्लीश मिडीयम हायस्कूलच्या २७ व्या वार्षीक स्नेह संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

 ते पुढे म्हणाले की, डिजिटल व इंटरनेट तंत्रज्ञान व माहिती भांडार यासाठी फार उपयुक्त आहे. अर्थात, ते केवळ तंत्र म्हणून न स्वीकारता, त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा ज्या गोष्ट्री आपण फक्त सिनेमे किंवा गोष्टींमध्ये ऐकल्या आणि बघीतल्या त्या आता प्रत्यक्षात घडत आहेत. यावेळी त्यांनी सोशल मिडीयाचे दुष्परीनाम ही समजावत कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त करत उपस्थितांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 
दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सिस्टर डॉक्टर बेनिंजा एस. सी. एस. ए .या उपस्थित होत्या त्या सेंट् लुक हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत आहेत. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ आसिफ जीवनी (मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय पुणतांबा ) व कुमारी नेहा ओझा (एअर होस्टेस एअर इंडिया) त्याचप्रमाणे रेव्ह. फादर जीमिल व्ही. सी.( प्रेसिडेंट ऑफ व्ही एम एस एस अहिल्यानगर) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह. फादर सीजो व रेव्ह  फादर फ्रॅंको आणि विद्यालयाच्या प्राचार्य रेव्ह सिस्टर सेलीन ,रवींद्र लोंढे यांची कार्यक्रमाला अनमोल असे मार्गदर्शन लाभले.  मुलांनी विविध कला गुणांचे प्रदर्शन केले. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 
         या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. श्रीरामपूर येथील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल गॅदरिंग या कार्यक्रमांमध्ये रतन टाटा यांची एक थीम घेऊ श्रद्धांजली देण्यात आली (छायाचित्रकार अमोल कदम)
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
*संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close