shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात स्कूल कनेक्ट 2.0 अभियान यशस्वीपणे राबवले.

एरंडोल: दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात स्कूल कनेक्ट 2.0 अभियान यशस्वीपणे राबवले.

एरंडोल
:- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट 2.0 अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत नवीन शिक्षण प्रणाली व कौशल्याधारित शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करणे हा होता.  
एरंडोल: दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात स्कूल कनेक्ट 2.0 अभियान यशस्वीपणे राबवले.

कार्यशाळेचा सहभाग आणि मार्गदर्शन...

कार्यशाळेत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी, जिजामाता माध्यमिक विद्यालय, रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, तसेच महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.  

सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. एस.एम. साळुंखे व राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक प्रा. योगेश यंडाईत यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. 

मार्गदर्शनाचे मुख्य मुद्दे...

1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020):**

   - नवीन शिक्षण प्रणालीची रचना (5+3+3+4).

   - विषय निवडीचे स्वातंत्र्य, श्रेयांक पद्धती आणि प्रवेश-निर्गमनाचे पर्याय.

   - रोजगाराभिमुख शिक्षण व कौशल्यविकास.

शासनाच्या योजना...

   - स्वयं, महास्वयं, साथी व विद्यालक्ष्मी योजनेची माहिती. 

कार्यक्रमातील मान्यवरांची उपस्थिती...

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. उपप्राचार्य  डॉ. ए.ए. बडगुजर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.एस. पाटील, तसेच जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण केदार, पर्यवेक्षक  प्रा. नरेंद्र गायकवाड व इतर मान्यवर प्राध्यापक उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे समारोप...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन  प्रा. सागर पाटील यांनी मांडले.रा.ती. काबरे विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा देखील या कार्यशाळेसाठी मोठा सहभाग होता. स्कूल कनेक्ट 2.0 अभियानाने विद्यार्थ्यांना शिक्षण प्रणालीतील नवनवीन संधी व कौशल्यविकासाचा मार्ग दाखवून दिला,यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. 

close