एरंडोल - राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या हस्ते ११ जानेवारी २०२५ रोजी उत्साहात करण्यात आला. शुभारंभ फलकाची फित कापून करण्यात आला, आणि सदर अभियान ३१ जानेवारी २०२५ पर्यंत राबविले जाणार आहे.
*या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये...*
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डि.डी.एस.पी. महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील होते, तर प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या छाया दिदी व डॉ. सुरेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
*प्रास्ताविक..* बसस्थानक प्रमुख गोविंदा बागुल यांनी केले.
*सुत्रसंचालन..* किशोर मोराणकर आणि सतीश महाजन यांनी कुशलतेने कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
*आभारप्रदर्शन..* आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी मानले.
*उपस्थिती...*
कार्यक्रमाला चालक, वाहक, तांत्रिक कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानाद्वारे रस्ते सुरक्षेच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
*अभियानाची कालमर्यादा:*
रस्ते सुरक्षा अभियान ११ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रभावीपणे राबविले जाणार असून, प्रवाशांमध्ये सुरक्षित वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती केली जाईल.