shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाच्या वतीने "स्कुल कनेक्ट भाग 2.0"अंतर्गत केज तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाच्या वतीने 1 ते 15 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,-2020अंतर्गत स्कुल कनेक्ट 2.0 संपर्क अभियानांतर्गत केज तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयात जन जागृती कार्यक्रम घेण्यात आला.
     
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या दृष्टीने विद्यार्थी, शिक्षक,पालक या मध्ये जागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने "स्कूल कनेक्ट भाग  0.2" संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज च्या वतीने वसंत विद्यालय, जय भवानी कन्या प्रशाला केज ,शंकर विद्यालय साळेगाव ,लाल बहादूर शास्त्री विद्यालय चंदन सावरगाव,शंकर विद्यालय  साळेगाव,माऊली विद्यालय जवळबन या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

या शाळेत जावुन आडसकर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नविन शैक्षणिक धोरणावर चर्चा करुन जन जागृती केली.
       
त्याच बरोबर महाविद्यालयातील ग्रंथालय व माहिती केंद्र यांच्या वतीने वाचन संकल्प पंधरवडा शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून न यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
      
हे अभियान बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधवराव फावडे, ग्रंथालय प्रमुख डॉ.आशा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली  राबविण्यात आले.

या संपर्क अभियानास शिक्षक व विद्यार्थी,पालक यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
close