आज 76 वा प्रजासत्ताक दिन केजच्या मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर मॉडेल इंग्लिश स्कूलचे संचालक दत्ता भैया नाईकवाडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले .याप्रसंगी श्री शिवराम आबा घुले सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी जोशी मॅडम तसेच शाळेतील इतर सर्व कर्मचारी ,शिक्षक ,पालक वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.
76 व्या गणतंत्र दिनानिमित्त मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. यात भाषण ,लेझीम तसेच विविध स्पर्धा मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये प्राविण्य दाखवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना संचालक दत्ता भैया नाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य ,समता, बंधुता ,न्याय ही मूल्य प्रधान करणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण करून भारत देशातील सर्वात मोठी लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांसोबत घेतला.
तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.केजच्या मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये अशा आनंदमयी वातावरणात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला