shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एरंडोलमध्ये आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळा संपन्न.

         

एरंडोलमध्ये आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळा संपन्न.

एरंडोल, जळगाव.

बाप ही सुसंस्कृत पिढी घडवणारी आदर्श व्यक्ती असून कुटुंबाला प्रगतीपथावर नेणाऱ्या अशा बापांचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सदानंद भावसार यांनी केले.
ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे आयोजित आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.  
एरंडोलमध्ये आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळा संपन्न.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, प्रा. एन. ए. पाटील, निवृत्त तहसीलदार अरुण भाऊ माळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

एरंडोलमध्ये आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळा संपन्न.

एरंडोलमध्ये आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळा संपन्न.

 

*२२ वडिलांचा विशेष सन्मान..*

कार्यक्रमात कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या २२ वडिलांना आदर्श बाप गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये निवृत्त पोलीस निरीक्षक, शिक्षक, शेतकरी व इतर विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या आदर्श वडिलांचा समावेश होता.  

              *प्रमुख वक्त्यांचे मनोगत..*

*सदानंद भावसार (अध्यक्ष):*

  त्यांनी सांगितले की, मुलांनी त्यांच्या पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यांना प्रेम व आदर दिला पाहिजे. अशा कार्यक्रमांमुळे समाजात पालकांविषयी कृतज्ञतेची भावना वाढीस लागते.  

*उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड:*

  बाप महोत्सव हा समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम असून मुलांनी त्यांच्या वडिलांचे जीवन अधिक सुखकर कसे करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.  

*गजानन पाटील (सामाजिक कार्यकर्ते):*  

  त्यांनी आई-वडिलांची सेवा हीच खरी भक्ती असल्याचे सांगून त्यांच्या सेवेत कसूर न करता त्यांना भरभरून प्रेम व आदर द्यावा, असे आवाहन केले.  

*कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन...*

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी केले, तर आभारप्रदर्शन निंबा बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऊर्जा संस्थेचे अध्यक्ष अंजली महाजन, सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव विनायक कुलकर्णी व इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.   

हा पुरस्कार सोहळा कुटुंब व्यवस्थेतील वडिलांच्या महत्त्वाला व आदर्श वडिलांची भूमिका समाजापुढे उभी करत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.  

close