प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील कळंबअंबा गावच्या माजी उपसरपंच यांचे पती ज्ञानेश्वर उर्फ माऊली इंगळे यांनी बुधवारी (दि.१) बीडचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. त्यांनी स्वतःचे अपहरण झाले असून आपण अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पलायन करून पोलिसांकडे तक्रारीसाठी आलो आहे, असे सांगत प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचा जाणीवपूर्वक उल्लेख करून बदनामी केली आहे, याबाबत पोलीस प्रशासनाने कार्यवाही करावी. याबाबत आपण केज पोलिसांकडे तक्रार करून सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी सांगितले आहे.
कळंबअंबा गावच्या माजी उपसरपंच यांचे पती ज्ञानेश्वर उर्फ माऊली इंगळे यांनी कोरेगावचे माजी सरपंच दत्ता तांदळे यांच्यासह सहकाऱ्यांनी अपहरण केल्याचा दावा केला आहे. त्या अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून पलायन करून आपण थेट एसपी ऑफिसमध्ये आलो आहे, अशी सर्व माहिती ज्ञानेश्वर उर्फ माऊली इंगळे यांनी एका व्हिडिओद्वारे दिली. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सुरुवातीस म्हटले की, मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडून निधी आणण्यासाठी जायचे असून टक्केवारीचे पैसे घेऊन ये, मुंबईला सोबत जाऊ, असे दत्ता तांदळे यांनी सांगितले. त्यानुसार श्री.इंगळे हे २ लाख रुपये घेऊन त्यांच्यासमवेत निघाले असता, पाटोदा तालुक्यात एका ठिकाणी घरामध्ये डांबून ठेवले, तिथे मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्या ठिकाणाहून आपण स्वतःची सुटका करून घेत पलायन केल्याचे इंगळे यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. कारण, इंगळे व तांदळे हे दोघे केज तालुक्यातील तालुकास्तरावरील कार्यकर्ते/नेते आहेत.
या दोघांवर काही गुन्हे देखील दाखल आहेत, हे दोघेही मनसे पक्षाचे माजी पदाधिकारी आहेत. या दोघांची मैत्री देखील असल्याचे तालुक्यात सर्वश्रुत आहे. इंगळे हे व्याजाने पैसे पण देतात भक्कम व्याज घेऊन ते पण अनधिकृत पुणे . तसेच या दोघांच्या वैयक्तिक आर्थिक वादातून कदाचित गैरप्रकार घडलेला असावा. परंतु ज्ञानेश्वर उर्फ माऊली इंगळे यांनी मा.पंकजाताई मुंडे यांचे नाव केवळ आणि केवळ बदनामीच्या उद्देशाने घेतले. त्यांच्या या विधानामुळे केज तालुक्यात सामाजिक कटूता निर्माण होऊ शकते. सदरील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून ना. पंकजाताई मुंडे यांचे नाहक बदनामी केली जात आहे.
त्यामुळे पोलिसांनी तातडीने सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे. ना.पंकजाताईंची बदनामी आपण कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी दिला आहे.