श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण (सर) यांची श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नजीरभाई शेख मित्रमंडळ, दोस्ती फाऊंडेशन,फातेमा वेलविशर्स समूह आणी मानवता संदेश फाउंडेशन यांच्या अशा विविध सेवाभावी संस्था, संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार सलिमखान पठाण (सर) हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असुन ते पत्रकारीतेचे गाढे अभ्यासकही आहेत, विविध वर्तमानपत्रातून माहे रमजानूल मुबारक महिन्यात प्रसिद्ध होणारी त्यांची रमजानूल मुबारक ही लेखमालेच्या माध्यमातून ते राज्यभर सर्वांना सुपरिचित आहेत. तसेच विविध प्रसार माध्यमातून विविध विषयांकित ते सातत्याने सामाजाभिमुख लेख बातम्यांच्या माध्यमातून मोठी जनसेवाही करत आहेत.
शिक्षकी पेशा असल्याने सर्वभौम असा त्यांचा गाढा अभ्यास आहेच शिवाय पत्रकारितेत देखील त्यांचे मोठे महत्वाचे स्थान असल्याने त्यांची मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.यामुळे अनेक नवोदित पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहेत.करीता विविध सामाजिक संस्था,संघटनेंच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तथा त्यांच्या भावी उज्वल कार्यास हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.
या प्रसंगी सलिमखान पठाण (सर) यांचा सत्कार करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नजीरभाई शेख,दोस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख (सर) मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष जाकीर सय्यद,अभियंता एस.के. खान, बुऱ्हाण भाई जमादार,केंद्रसमन्वयक फारूक पटेल,स्वस्तधान्य दुकान असोसिएशनचे सचिव रज्जाक पठाण,नसीर सय्यद सर,फिरोज पठाण सर, अन्वर शेख, समीर शेख, साजिद शेख,फिरोज पठाण साबणवाले,चांदभाई पठाण, सैंदाणे आदी फातेमा वेलविशर्स समूह,मिल्लत नगर मित्र मंडळ व मानवता संदेश फाउंडेशन सदस्य उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111