संजय माकणे(चाकूर ता. प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष श्री दिलीपरावजी देशमुख मालक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चाकुरच्या वतीने आज दिनांक १०/१/२०२५ रोजी भव्य सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन चाकूर तालुका युवा मोर्चा सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. उपस्थित माननीय जिल्हाध्यक्ष श्री दिलीपरावजी देशमुख यांनी यांनी मार्गदर्शन केले.
या रोगनिदान शिबिरास डॉ. अजय नारायणकर सर,डॉ. अश्विनी नारायणराव मॅडम,डॉ. बाहेती सर,डॉ.ज्ञानेश्वर सुर्यवंशी आदी डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा चाकूर तालुका अध्यक्ष भरत गुरमे ,रामकृष्ण कोतलापुरे,रनजीत पाटील जिला उपाध्यक्ष. जिल्हा उपाध्यक्ष हानमंतराव पाटील,संतोष माने,रमेश पाटील, शंभू शिंदे व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.