श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील एस.टी. बस आगार या ठिकाणी रस्ता सुरक्षितता अभियान - २०२५ याविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान येथील हिंदसेवा मंडळाच्या भि.रा.खटोड कन्या प्रशालाचे प्रा. आदिनाथ जोशी (सर) यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथी म्हणून भारतीय डाक (पोस्ट) विभागातील विकास अधिकारी विजय कोल्हे,एस टी. बस आगार विभागीय लेखा अधिकारी सौ.वृंदा कंगले, आगार व्यवस्थापक शरद खोत,वाहतूक निरीक्षक अनिल पटारे,आगार लेखाकर मोनिका बददर, तसेच आगारातील चालक, वाहक, यांत्रिक प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ॲड आदिनाथ जोशी (सर) यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ या अभियानाचे उद्घाटन बॅनरची फीत कापून करण्यात आले.
प्रसंगी श्री.जोशी यांनी राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी यांनी सुरक्षित सेवा देण्यासाठी दैनंदिन शारीरिक व्यायाम व ध्यान धारणा याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तथा यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते तसेच आजही सर्वसामान्य नागरिक तसेच प्रवासी यांचा रा.प. महामंडळावर विश्वास पक्का असल्याचे प्रतिपादन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जसा पुर्वीपासून आजतगायत तसा एस टी महामंडळावर प्रवाशांचा विश्वास कायम आहे तो भविष्यात देखील तसाच कायम टिकून राहण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असावे असे आवाहन करत अपघात टाळण्यासाठी व्यसनापासून दूर रहावे याबाबत त्यांनी मार्गदर्शनही केले.
विजय कोल्हे यांनी चालक आणि वाहक यांच्या सेवेबद्दल कौतुक करत अपघात टाळण्यासाठी प्रयत्नशील असावे अशी माहिती दिली तसेच विभागीय लेखाधिकारी सौ. वृंदा कंगले यांनी सुरक्षित सेवा तसेच न्यायालयीन कामकाज नुकसान भरपाई आदि विषयी माहिती दिली.
यावेळी श्रीरामपूर आगारातील विना अपघात सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक संदीप गवते यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई
(वडाळा महादेव)
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111