अकोले:-
अकोले तालुक्यातील वाशेरे गावचे सुपुत्र, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते, रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिरकांडे यांना माजी आमदार पी जे रोहोम फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसंसद पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमांस माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशन च्या अध्यक्ष जयश्री थोरात, रिपाइं चे जेष्ठ नेते सुधाकर रोहोम, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, मुख्य संयोजक किरण रोहोम, रिपाइं चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशराव देठे, जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव सर आदी उपस्थित होते. यावेळी सन्मानचिन्ह, शाल पुष्पगुच्छ देऊन शिरकांडे यांना सन्मानित करण्यात आले.
श्री. शिरकांडे यांनी वाशेरे गावच्या विकासात खुप मोठे योगदान दिलेले आहे. गावचे सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी पदे भूषवली आहेत. ते वाशेरे गावचे तंटामुक्ती चे अध्यक्ष आहेत. गाव विकासातील योगदानाची दखल घेत पुरस्कार समितीने त्यांची निवड केली.
या निवडीबद्दल या पुरस्काराने त्यांचे विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत असून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, रिपाई चे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, तालुकाध्यक्ष कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, वाशेरे सरपंच किरण गजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद वाकचौरे, चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, किशोर शिंदे, सावळेराम गायकवाड, वसंत उघडे यांनी अभिनंदन केले.