76 व्या प्रजासत्ताक दिनी सिद्धिविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्था बीड संचलित लक्ष्मी नर्सिंग स्कूल मध्ये झेंडावंदन व पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
केज येथील लक्ष्मी नर्सिंग स्कूल मध्ये आज सकाळी साडेआठ वाजता संस्थापक अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर संपन्न झाल्यानंतर लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये पालक मेळावा पार पडला. या मेळाव्याला भागवत कथाकार ह.भ. प केशव शास्त्री महाराज सारुकवाडीकर, श्रीराम कथाकार ह. भ .प केशव शास्त्री महाराज घुले टाकळीकर, माजी जी .प .सदस्या उषाताई ताई मुंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
युवा नेते मधुर मुंडे व लक्ष्मी नर्सिंग स्कूल चे प्राचार्य रवी पवार सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन आभार मानले.
वरील कार्यक्रमास लक्ष्मी नर्सिंग स्कूल चे विद्यार्थी व विद्यार्थिनी ,कर्मचारी ,शिक्षक व सर्व स्टाफ उपस्थित होता.
केज शहरातील लक्ष्मी नर्सिंग स्कूल संस्थापक अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे हे नक्की.