नगर / प्रतिनिधी:
जिल्ह्यातील शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, पारनेर व जामखेड या तालुक्यातील मोटार वाहन मालक व चालक यांच्या सोयीसाठी अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचे जानेवारी २०२५ ते जून २०२५ या कालावधीतील मासिक शिबिर वेळापत्रक जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे.
शेवगाव व श्रीगोंदा तालुक्यात ७ व २१ जानेवारी २०२५, ४ व १८ फेब्रुवारी, ४ व १८ मार्च , ८ व २२ एप्रिल , ६ व २० मे आणि जून महिन्यात १० व २५ जून २०२५ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येईल.
कर्जत व पाथर्डी तालुक्यात ८ व २२ जानेवारी २०२५, ५ व १७ फेब्रुवारी, ५ व १९ मार्च, ९ व २३ एप्रिल, ७ व २१ मे आणि ११ व २५ जून २०२५ रोजी शिबिराचे आयोजन होईल.
पारनेर व जामखेड तालुक्यात ९ व २३ जानेवारी २०२५, ६ व २० फेब्रुवारी, ६ व २० मार्च, ११ व २४ एप्रिल, ८ व २२ मे आणि १२ व २६ जून २०२५ असे मासिक शिबिर वेळापत्रक आहे.
नियोजित मासिक दौऱ्याच्या दिनांकाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल किंवा शासकीय सुट्टी जाहीर होईल तसेच प्रशासकीय कारणास्तव दौरा रद्द झाल्यास त्या दिवसाच्या मासिक दौऱ्याचे कामकाज दुसऱ्या सोईस्कर दिवशी होईल व त्याची तारीख त्यावेळी जाहीर करण्यात येईल. अर्जदारांची अपूर्ण कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्विकारली जाणार नाहीत. शिबिराचे सर्व कामकाजाबाबत शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक राहील.
दौऱ्याच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने व बसेसची तपासणी केली जाणार नाही. ज्या तालुक्यात शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याच तालुक्यातील नागरिकांचे शिबिरामध्ये कामकाज करण्यात येईल. शिबिर कामकाज ठिकाणी तपासणी होणाऱ्या सर्व नवीन तात्पुरती नोंदणी झालेल्या परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांचे डिस्क्लेमर असल्याशिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री.सगरे यांनी केले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111