shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

पंजाबमधील शेतकरी आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा निषेध करण्यासाठी लाक्षणिक उपोषण-अशोक सब्बन

पंजाबमधील शेतकरी आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा निषेध करण्यासाठी लाक्षणिक उपोषण

-अशोक सब्बन

पंजाब सधील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांनी उपोषण सोडावे यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले असल्याची माहिती अनिल घनवट यांनी  दिली.

पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे एक वर्षा पासून सुरू आहे.
कृषी मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावा अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. अकरा महिने झाले तरी केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही असे पाहून *भारतीय किसन युनियन (अराजनैतिक) या संघटनेचे अध्यक्ष सरदार जगजितसिंग डल्लेवाल यांनी उपोषणाला सुरु केले. आज पंचावन्न दिवस उलटून गेले तरी सरकार बोलणी करण्यास तयार नाही.* 

त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

एका शेतकरी आंदोलनाला ज्या पद्धतीने सरकार वागणूक देत आहे निषेधार्ह आहे. शांततेच्या मार्गाने अतिशय अहिंसक पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे.
 देशाचे पंतप्रधान किंवा कृषी मंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळा बरोबर चर्चा करावी. जे शक्य असेल ते मंजूर करावे, नसेल ते का करता येत नाही ते समजून सांगावे असे ॲड.कारभारी गवळी यांनी अहील्यानगर येथे झालेल्या आंदोलनात केले. पूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध करायला हवा. आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एक किमान समान कार्यक्रम घेऊन सरकारकडे शेतकरी हिताचे धोरण तयार करण्यास भाग पाडले पाहिजे असे ही ते म्हणाले.

अहील्यानगरसह महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात लाक्षणिक उपोषणाचे आंदोलन करण्यात आले.

अहील्यानागरचे जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले. जिल्हाधिकारी कार्यालय समोर झालेल्या आंदोलनात अनिल घनवट, अशोक सब्बन, ॲड.कारभारी गवळी,विक्रम शेळके, नीलेश शेडगे, वामनराव भदे,  सुनीता दिघे, शीतल पोकळे, बाळासाहेब सातव, अंबादास वानखेडे, नवनाथ चव्हाण, पांडुरंग पडवळ, महादेव खामकर, बाबासाहेब रिकामे, कारभारी कणसे, डॉ. संजय कुलकर्णी भारतीय जनसंसदेचे सुधिर भद्रे, पोपट साठे,रईस शेख,बीरबहादूर प्रजापती,बाळासाहेब पालवे,कैलास पठारे,आदी नेते सहभागी झाले होते.
close