shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कोल्हापूरात दुचाकी रॅली संपन्न


वाहतूक नियमांची जनजागृती 
विविध उपक्रमांचे आयोजन 

मोहिद एस.कच्ची/ कोल्हापूर 
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संपुर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान -२०२५ हे  दि.०१ जानेवारी २०२५ ते दि.३१ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.

याअनुषंगाने सदर अभियानाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती होणेकरीता व प्रबोधन होणेकामी दि. ०१/०१/२०२५ रोजी सकाळी १० वाजता दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दुचाकी रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथून सुरु होऊन खानविलकर पेट्रोल पंप, दसरा चौक - बिंदु चौक - छ. शिवाजी महाराज पुतळा, मनपा चौक, सीपीआर हॉस्पीटल, व्हिनस कॉर्नर,ताराराणी चौक ते प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यापर्यंत निश्चित करण्यात आला होता.

या दुचाकी रॅलीचे उद्घाटन मा. श्री. अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, कोल्हापूर यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. याप्रसंगी श्री. संजय तेली, अपर जिल्हाधिकारी, श्री. चंद्रकांत आयरेकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्री. संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर, पोलीस निरिक्षक, शहर वाहतूक, इतर शासकीय विभागाचे अधिकारी, सामाजिक रस्ता सुरक्षा संस्था पदाधिकारी श्री. रेवणकर तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन निरिक्षक, सहा, मोटार वाहन निरिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीमध्ये सुमारे १०० दुचाकीधारकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून रस्ते सुरक्षा प्रबोधनात्मक कार्य केले आहे.

या कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा अभियान-२०२५ अंतर्गत दि. ०१/०१/२०२५ ते दि.३१/०१/२०२५ या कालावधीत पोलीस, आरोग्य, शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये प्रामुख्याने रस्ता सुरक्षासंबंधी बॅनर तयार करून मुख्य रस्त्यावर महत्वाचे ठिकाणी प्रदर्शित करणे, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी रस्ता सुरक्षाविषयी व्याख्याने आयोजित करणे, रस्त्यावरील परिवहन वाहने, बैलगाडी, ट्रॅक्टर व ट्रॉली या वाहनांना परावर्तिका लावणे, वाहनचालकांकरीता नेत्रतपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीरांचे आयोजन करणे, मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या प्रशिक्षकासाठी उजळणी कार्यशाळा आयोजित करणे, रस्ते अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींसंदर्भात विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन करणे, विविध प्रसारमाध्यमाव्दारे रस्ता सुरक्षा स्लोगन प्रदर्शित करणे, इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
 9561174111
close