shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत काचोळे विद्यालयाचे नेत्रदीपक यश


 चित्रकला स्पर्धेतही विद्यालयाचे सुयश

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत आणि मतदार नोंदणी व जनजागृती चित्रकला स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. 

       शासकीय इंटरमिजिएट परीक्षेत १० विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त केली असून ४
विद्यार्थ्यांनी बी श्रेणी प्राप्त केली. या स्पर्धेसाठी एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर शासकीय एलिमेंट्री परीक्षेतही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. या परीक्षेत ५ विद्यार्थ्यांना ए श्रेणी प्राप्त झाली, १३ विद्यार्थ्यांना बी श्रेणी मिळाली या दोन्ही परीक्षांसाठी विद्यालयाचे ११८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते व या दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.
      तसेच नगर परिषद श्रीरामपूर यांच्या मार्फत टिळक वाचनालय येथे निवडणूक जन जागृती मतदान नोंदणी व मतदान जनजागृती चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात काचोळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. गौरी अजय भागवत हिने प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक वृषाली अजय गुलदगड, तृतीय क्रमांक पलक संतोष फासे व चौथा क्रमांक ऋतुजा राजेन्द्र होळकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मतदान जनजागृती व मतदार नोंदणी साठी आपले योगदान दिले.
       या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक श्री शेख ए. डी. यांनी मार्गदर्शन केले असून विद्यार्थ्यांकडून भरपूर सराव करून घेतल्यानेच विद्यालयाने हे सुयश प्राप्त केले.
       विद्यालयाच्या या कलाक्षेत्रातील उत्तुंग यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रकाश पाटील निकम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कला शिक्षक ए.डी.शेख, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर यांचे अभिनंदान व कौतुक केले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर -9561174111
close