shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अवैध दारू दुकान बंद करणेसंदर्भात आमदार अमोल खताळ यांना बानोबी शेखसह सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन

सोमवारपासून सुरू होणार आमरण उपोषण, उत्पादन शुल्क विभाग आणी पालिका अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

संगमनेर / प्रतिनिधी:
संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात कुरण रोड याठिकाणी अनाधिकृतपणे असलेले सागर वाईन नामक सरकारमान्य देशी दारू दुकान हे गेल्या काही वर्षापासून खोट्या कागदपत्राच्या आधारावर लायसन बनवून व्यवसाय सुरू असल्याचा आरोप सर्वतो कागदपत्राच्या पुराव्यांनिशी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे तथा याबाबतचे आवश्यक सर्व ते पुरावे देखील त्यांनी संबंधित प्रशासनाला व प्रसार माध्यमांना वारंवार दिलेले देखील आहेत,मात्र सदरील अवैध दारु दुकानावर अद्यापही कोणतीत कारवाई केली जात नसल्याने उद्या सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी पासून आमरण उपोषण देखील त्याच दारू दुकानाच्या समोर कुरण रोड या ठिकाणी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
या संदर्भात त्यांनी आज संगमनेरचे आमदार अमोल खताळ - पाटील यांची  प्रत्येक्ष भेट घेऊन त्यांना उपोषणाचे निवेदन देत सदर प्रकरणी आवश्यक सर्व कागदपत्रांचा योग्य पाठपुरावा देखील केला आहे, 
सदर निवेदन स्विकारताना आमदार अमोल खताळ - पाटील यांनी देखील आपण दिलेल्या कागदोपत्राची सर्व ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांशी याची योग्य शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासने  दिले आहेत, तर पुढे बोलताना अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर शहर व तालुक्यात विविध अवैध व्यवसाय तसेच शासनाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, अश्यांची गय देखील केली जाणार नाही, योग्य वेळी योग्य ती कारवाई केली जाईल असा दिलासा देखील आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.
सदरचे प्रकरण बघता,
सदरील देशी दारू दुकानाच्या कागदपत्राचा पाठपुरावा करत असताना माहिती अधिकाराच्या अर्जामध्ये नगरपालिकेने उत्तर देताना स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे की, सदरचे दुकान हे आमच्या कुठल्याही परवानग्या न घेता, आमचा कुठलाही कर न भरता, आमचे कुठलेही ना हरकत दाखले न घेता, आमच्या विभागांमध्ये कुठलीही नोंद न करता केलेला गैरप्रकार - कारस्थान असून या संबंधी आमच्याकडे कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.

मग धडधडीत असे असताना संगमनेर नगरपालिका व पालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी सदर दुकान धारक मालकाला का पाठीशी घालत आहेत ?, इतर ठिकाणी अतिक्रमण काढली जातात मात्र या देशी दारू दुकानाचे अतिक्रमण का हटवले जात नाही ?  हा देखील मोठा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेसमोर उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे या दुकानाचा सर्व लेखाजोखा हा अहिल्यानगर दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाकडे असून तिथे देखील पाठपुरावा केलेला आहे, मग संगमनेर शहरात विराजमान झालेले दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्रबुद्धे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे विभागीय दारुबंदी उत्पादन शुल्क अधिकारी सोनोणे हे या दुकानदारास कारवाई करण्याऐवजी का पाठीशी घालत आहेत ? हा देखील मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेस पडलेला आहे. त्यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा आहे की, या दुकानाचे अनाधिकृत बांधकाम आणि अनाधिकृत देशी दारू दुकानाला लायसन देणारे या सर्वांचे लागेबांधे असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
असो उद्या सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ सकाळी दहा वाजल्यापासून सदरचे उपोषण हे सध्या अस्तित्वात असलेल्या अवैध दारू दुकानासमोर सुरू होणार असून याबाबत संबंधित प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार अमोल खताळ यांना निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा बानोबी शेख, सामाजिक कार्यकर्ते जमीर उर्फ बब्बू पाकीजा, आकील पठाण, हाजी अब्दुल कादीर शेख, मुजम्मिल उर्फ गुड्डू भाई शेख आदी उपस्थित होते.
close