एरंडोल – आस्था महिला मंडळातर्फे २९ जानेवारी २०२५ रोजी शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पत्रकारांना बुके आणि पेन देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची कधीही अपेक्षा ठेवली नाही. निस्पृह भावनेने आणि औपचारिकतेला फाटा देत, त्यांनी हा सन्मान सोहळा साधेपणाने साजरा केला.
या कार्यक्रमाला आमदार अमोल पाटील यांच्या धर्मपत्नी मृणालिनीताई पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी ॲड. मोहन शुक्ला होते.
कार्यक्रमात नंदा शुक्ला यांनी पत्रकारांच्या कार्यावर एक कविता सादर केली, तर शोभा साळी यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. प्रास्ताविक शितल चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती ठाकूर, उपाध्यक्षा नंदा शुक्ला, शोभा साळी, शकुंतला अहिरराव, चंद्रकला जैन, शितल चौधरी, भारती साळुंखे आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करून महिला मंडळाच्या सदस्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. याबद्दल उपस्थित पत्रकारांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.