सांगली :- अनिल पवार
अंगणवाडी क्र. ३५१ नागठाणे, ता. जि. सातारा. मध्ये अंगणवाडी सेविका ( नागठाणे बिट प्रमुख ) सौ. भारती दिनेश वेळापुरे, यांच्या संकल्पनेतून संक्रांत साननिमित्त हळदी - कुंकू कार्यक्रमा सोबतच ३ ते ५ वयो गटातील विध्यार्थी व पालकांच्या ( माता ) माद्यमातून आधुनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात चिमुकल्यानचा डान्स, कला व बौद्धिकता पाहून पालक मंत्रमुग्ध झाले. आपल्याच चिमुकल्यांची बौद्धिक क्षमता, कला व नृत्य पाहून उपस्थित महिलानि वेळापुरे मॅडमची पाठ थोपटली. तसेच मॅडम स्वतः च्या कल्पक बुद्धीने पालक ( महिलां ) साठी अल्प वेळे साठी खेळ घेण्यात आला. त्या मध्ये कागदावर शब्द दिला होता. ज्या शब्दाचं चिठठी पालक ( मातेच्या ) हाती पडेल त्यांनी ती कला सादर करायचे या पद्धतीने कोन नृत्य, भाषण, उखाणे, संगीत व इतर कला सादर करून छोट्याश्या आंगणवाडीच्या हळदी -कुंकूच्या कार्यक्रमास चारचांद लावले.
महिलानच्या आत लपलेले कलागुण बाहेर आले. यातून असा संदेश देण्यात आला की माता -पित्यानी मोबाईलवर वेळ न घालविता आपल्या मुलाना वेळ दिला पाहिजे. असे मत अंगणवाडी सेविका भारती दिनेश वेळापुरे मॅडम नि मांडले यांस पालकांनी नि चांगला प्रतिसाद दिला. इंग्लिश मेडियमच्या जमाण्यात अंगणवाडीत छान कार्यक्रम पाहून अंगणवाडी सेविका ( बिट प्रमुख नागठाणे ) सौ. वेळापूरे मॅडम ची कौतुक करीत सर्वानी एकमेकांना तिळगूळ व वान देवून कार्यक्रमाची सांगता केली. हे कार्यक्रम सिस्तबद्द संपन्न होण्यासाठी मदतनीस कोकाटे मॅडमनी ही मनापासून कष्ट घेतले.