shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमाचे यशस्वी आयोजन.

दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमाचे यशस्वी आयोजन.

एरंडोल (जिल्हा जळगाव)
- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमांतर्गत 29 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमाचे यशस्वी आयोजन.

दिनांक 30 व 31 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.ए. बडगुज, माजी प्रभारी प्राचार्य प्रा. एन.ए. पाटील, प्रा. के.जे. वाघ, डॉ. एन.एस. तायडे, डॉ. आर.एस. वानखेडे, डॉ. एन.व्ही. दांडेकर, डॉ. एच.एम. पाटील, कार्यालय अधीक्षक एस.एस. बोरसे, ग्रंथपाल डॉ. शर्मिला व्ही. गाडगे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन पाटील, दिनेश पवार, प्राध्यापक वृंद, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. डॉ. शर्मिला व्ही. गाडगे यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली.

"वाचन हे जीवन समृद्ध करते" या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

close