महिलांच्या गुलामीच्या बेड्या तोडणारे महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले !... - पी डी पाटील.
सावित्रीमाईंमुळेच घरा- घरातील महिला सन्मानाने जगत आहे - लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ]
सोपान भवरे यांच्याकडून सर्व श्रोत्यांना पी डी पाटील लिखित "आदर्श महामाता " ग्रंथ भेट !...
मोतीलाल महाजन यांच्याकडून अन्नधान्याचे किट वाटप !..
अमळनेर - तालुक्यातील कळमसरे या गावात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंतीचे औचित्य साधून महिला मुक्ती दिन व बालिका दिन निमित्त वैचारिक प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोतीलाल महाजन यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक सुदाम महाजन होते. प्रमुख व्याख्याते म्हणून सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष तथा महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक पी डी पाटील, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा आर टी आय चे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक विधी कर्ते शिवदास महाजन, मोहित पवार उपस्थित होते.विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथींचे गुलाबपुष्प व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख व्याख्याते पी डी पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सांगून त्यांचे शैक्षणिक - सामाजिक कार्य विशद केले.अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढणारे दाम्पत्य म्हणजेच फुले दांपत्य होय. शिक्षणाची क्रांती करून समस्त महिलांना गुलामगिरीतून मुक्त केले. कळमसरावासियांनी सत्यशोधक समाजाची कास धरा व या कळमसरे गावात सत्यशोधक पद्धतीने विधी करावे असे आवाहन पाटील यांनी केले.
शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी माईंची थोरवी सांगुन त्यांचा सामाजिक - शैक्षणिक संघर्ष उलगडला. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आला म्हणून शिवजयंती चे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आहेत. नव्या पिढीने महापुरुषांचे विचार आत्मसात करून मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.या वैचारिक कार्यक्रमाला कळमसरे माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक सोपान भवरे यांच्याकडून पी डी पाटील लिखित "आदर्श महामता " हे ग्रंथ भेट देण्यात आले. प्रबोधनाच्या समारोपाप्रसंगी मुलांना प्रश्न उत्तराच्या माध्यमातून ग्रंथ भेट देण्यात आले.
याप्रसंगी कळमसरे गावातील मोतीलाल महाजन व सचिन निकम यांच्याकडून व्याख्याते यांच्या हस्ते अनिता पाटील यांना अन्नाचे किट देण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सदस्य सुदाम नाना महाजन, नथ्थू चौधरी, संजय महाजन, भरत महाजन,विठ्ठल नामदास, नगराज चौधरी, झुलाल चौधरी, कैलास महाजन, अशोक चौधरी, फिरोज पठाण, प्रतिभा चौधरी, उषा चौधरी, देशमुख ताई, हेमंत माळी,शांताराम माळी, चुनीनाल माळी, सुरेश माळी, दोधु माळी, नागराज माळी, संगीन माळी, मुरलीधर माळी, रतिलाल माळी, विजय माळी, नईम पठाण, सुभाष परदेशी, नितीन माळी, कडू माळी ,रोहिदास माळी, रघुनाथ माळी, गणेश माळी, गोकुळ माळी, पितांबर माळी, उषा माळी, अनिता माळी, वैजयंता माळी, सुशीला माळी, सुरेखा माळी, कविता माळी समस्त गावकरी महिला - पुरुष, शाळेतील मुले -मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतीलाल महाजन तर आभार सचिन निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कळमसरीवासी यांनी परिश्रम घेतले.