shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आदर्श शिक्षक श्री महादेव केंद्रे सरांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.

                                       -                                                       

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी!!                                      _.                                                     

चिंचोली माळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षक मुख्याध्यापक श्री.महादेव केंद्रे सर यांचा सपत्नीक सेवा पूर्ती गौरव सोहळा श्रीकृष्ण आश्रम, बीड रोड केज येथे गुरुवार दिनांक 02/01/2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री महादेव केंद्रे सर केज शहरातील शिक्षक कालनी भागामध्ये आपल्या कुटुंबासहीत अनेक वर्षांपासून राहतात. अत्यंत शांत संयमी स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.श्री.महादेव केंद्रे हे आदर्श शिक्षक तसेच मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून ओळखले जातात.त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत तसेच चिंचोली माळी पंचक्रोशीतील सर्व सामान्य, लहान मोठे, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन यांच्याशी त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे घनिष्ठ संबंध आहेत. 





आजच्या कार्यक्रमाला उपस्थित भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा,श्री.लक्ष्मण बेडसकर गट शिक्षणाधिकारी,ह.भ.प.केशव महाराज शास्त्री,मा.श्री . दिलीप वनवे शासकीय विद्यीतज्ञ , श्री.सुनील केंद्रे शि.वि.अधिकारी , दत्ताजी चाटे जे.शि.वि.अधिकारी , पठाण मॅडम जे .वि. अधिकारी, सुधाकर ढाकणे जे.वि.अधिकारी. श्रि बाबासाहेब केदार कें.मु.अ.चिंचोली माळी, दत्ता धस जे.सा.कार्यक्रते पञकार प्रकाश मुंडे तसेच अनेक मान्यवरांनी श्री महादेव केंद्रे सरांना व कुटुंबांना निरोगी आरोग्यासाठी उत्तम जिवनासाठी या प्रसंगी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा आवर्जून उल्लेख या हृदयपूर्ण  सेवापूर्ती सत्कार समारंभात व्यक्त केल्या. गुरूजी ईश्वरा पेक्षा आम्ही तुम्हाला मानतो कारण विश्वरामध्ये आम्ही तुम्हाला पाहतो अशा भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या . यावेळी श्री.महादेव केंद्रे यांच्या कुटुंबातील सौ.सुनीताताई केंद्रे,मुलगा वैभव केंद्रे,सुन शितल केंद्रे ,,मुली माया, मयुरी , जावाई बाळासाहेब आवाड तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक सहकारी उपस्थित होते.                                                  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन ढाकणे यांनी केले तर सत्कारमूर्ती श्री .महादेव केंद्रे सरांनी हृदयपूर्वक सेवागौरव सेवापुर्ती सत्कार समारंभातील सर्व उपस्थितांचे आभार मानले.

close