सातारा / प्रतिनिधी:
जिल्हा परिषद सातारा आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळज ने घवघवीत यश प्राप्त केले आहे.
यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तकप्रेम तसेच मला भावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही विषयांवर लहान गटातून इयत्ता चौथीतील चि.वैष्णव विकास खराडे याने प्रथम क्रमांक तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य तसेच थोर साहित्यिक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या विषयांवर मोठ्या गटातून इयत्ता सातवीतील कु. श्रावणी सुनील शिंदे हिने अनुक्रमे द्वितीय आणि उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले आहे.
तसेच हस्ताक्षर स्पर्धेत इयत्ता- सातवीतील कु.हर्षदा विनोद चोपडे हिने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
तसेच क्रिडा स्पर्धा लांब उडी मध्ये चि.सोहम भारत गाढवे याने उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त केले आहे.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका सौ.अंजना चिरमे व सर्व शिक्षक वृंद यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सर्वश्री अनिल संकपाळ, विस्ताराधिकारी चन्नय्या मठपती, बन्याबा पारसे, दारासिंग निकाळजे, सौ. अलका माने, केंद्रप्रमुख सौ.संगिता मगर,सरपंच संजय गाढवे, उपसरपंच विजय शिंदे.मुख्याध्यापिका सौ.अंजना चिरमे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल गाढवे, उपाध्यक्ष सौ.काजल काकडे तसेच पालक आणि ग्रामस्थ यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार प्रमीला साबळे - सातारा
*वृत्त विशेष सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111