श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले इतिहास विभाग प्रमुख प्रा. अशोकराव भागवतराव तुसे यांनी शैक्षणिक योगदानाचा आणि कौटुंबिक संस्कृतीचा आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी काढले.
श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील अनमोल लॉन्स येथे प्रा.अशोकराव तुसे यांचा विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान , वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि तुसे मित्रमंडळातर्फे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.
प्रा.अशोकराव भागवतराव तुसे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर, सातारा येथील शाखेत इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ सेवा केली. त्यांच्या शैक्षणिक, कार्यकुशल जीवन वाटचालीबद्दल विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सन्मानचिन्ह, शाल, बुके, विविधग्रंथ,भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला, तसेच विविध मित्रमंडळीतर्फे प्रा. तुसे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या भाषणात पुढे म्हणाले, प्रा. तुसे हे विद्यार्थी वर्गात प्रिय प्राध्यापक होते, त्यांनी चरित्र आणि चारित्र्याचा आदर्श निर्माण केला. आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले. सामाजिक स्नेहबंध जपले. पुस्तके वाचणे, विविध उपक्रमांत सहभागी होणे, प्रतिसाद देऊन अनेकांना प्रेरणा देणे आणि वाचत संस्कृतीला बळ देण्याचे केलेले उपक्रम कौतुकास्पद आहे.
यावेळी प्रा.अशोकराव तुसे यांनी स्वतःची ग्रंथतुला करून सर्व ग्रंथ ज्या शाळेत ते शिकले त्या पढेगांव येथील यशवंत विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ग्रंथ भेट दिले हे विशेष कौतुकस्पद आहे.
सुखदेव सुकळे म्हणाले,प्रा. तुसे आणि परिवार एक आदर्श परिवार आहे. प्रा. अशोकराव आणि सौ. सुलोचना तुसे यांनी समाजात आणि कौटुंबिक नातेबंधाचा आपलेपणा निर्माण केला. डॉ.सागर तुसे, प्राचार्या सौ. तृप्ती परदेशी, शिक्षिका सौ. वैशाली कुमावत, सौ. सारिका पवार, सौ.सपना कुमावत या मुलांनी वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला, हा आदर्श अनेकांना प्रेरणादायी ठरणारा असल्याचे सांगून सुखदेव सुकळे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी केशवराव भवरे, सपना कुमावत, संजय कुमावत, रावसाहेब परदेशी, रामप्रसाद परदेशी, भारती तुसे, स्वप्नील परदेशी , सारिका पवार, हरिश्चंद्र परदेशी, सीताबाई परदेशी, चांगदेव परदेशी, प्रा. एकनाथ औटी, प्रा.चंद्रभान चौधरी, संजय बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, सौ. शीतल बुरकुले आदिंनी प्रा. तुसे यांचा सन्मान करून मनोगतातून आपल्या आठवणी सांगितल्या.
सुनबाई सौ.उर्मिला तुसे यांनी सगळ्या कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली होती.
अनमोल लॉन्स गोरे रसवंती गृहाचे हेमंत गोरे, अनमोल गोरे यांनी नियोजन केले. प्रा. अशोकराव तुसे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111