shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सोशल मीडिया व इंटरनेट वापरताना मर्यादा ओळखा - पो. नि. देशमुख

काचोळे विद्यालयात सायबर क्राईम विषयी पो.नि.देशमुख यांचे मार्गदर्शन

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 रयत शिक्षण संस्थेचे येथील डी.डी.कचोळे माध्यमिक विद्यालयात, रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत सायबर क्राईम याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी विद्यालयाचे  मुख्याध्यापक सुनील साळवे व ५७ महाराष्ट्र बटालियन श्रीरामपूर सेक्टरचे मेजर उपस्थित होते.

         विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन देशमुख म्हणाले की,इंटरनेट वापरून केलेले गुन्हे हे सर्व सायबर क्राईम या संकल्पनेत येतात. दुसर्‍याच्या बँक अकाउंट मधून इंटरनेटचा वापर करून पैसे काढणे, इतरांच्या भावना दुखावणारे संदेश पाठवणे, प्रक्षोभक माहिती शेअर करणे, दुसऱ्याच्या माहितीचा व फोटोचा गैरवापर करणे, इतरांना धमकवणे अशा प्रकारचे सर्व गुन्हे सायबर क्राईम आहे. आपण अशा परिस्थिती ताबडतोब पोलिसांना संपर्क करणे. आपली माहिती इतरांना शेअर न करणे, अनोळखी लिंकला प्रतिसाद न देणे, सोशल मीडियावर आलेली माहिती पडताळून पाहणे, इंटरनेट व सोशल मीडिया वापराबाबत मर्यादा ओळखणे यासारखी सतर्कता आपण बाळगणे आवश्यक आहे. इंटरनेट वापराबाबत आपण साक्षर होणे ही काळाची गरज आहे.आजच्या काळात होणारे सायबर गुन्हे हे गुन्हेगारीचे नवे रुप आहे, याबाबत इंटरनेट वापरणाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
        याप्रसंगी नितीन देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला त्याचबरोबर देशाचे सुजान नागरिक घडवण्यासाठी विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब मुठे यांनी केले.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
close