धाराशिव (गुरुदत्त वाकदेकर) : माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री कविता पुदाले यांच्या संकल्पनेतून 'आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन थाटात संपन्न झाले. संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कमल नलावडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. ग्रंथदिंडी डॉ. सुलभा देशमुख यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन झाले. यावेळी प्राचार्य. डॉ. सुभाष राठोड, प्रा . रणजित दांगट, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. हशमबेग मिर्झा, डॉ. दयानंद भोवाळ, डॉ. तुळशिराम दबडे, डॉ. दिपक जगदाळे, अधिक्षक धनंजय पाटील, शिवाजीराव घुगे अणदूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यावर योग्य संस्कार होण्यासाठी प्रा. रणजित दांगट यांच्या 'आई समजून घेताना' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी आई विषय अत्यंत अलवारपणे व जिव्हाळ्याने श्रोत्यांना समजावून सांगितला आणि असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत असे म्हणून आयोजकांना धन्यवाद दिले. या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी "आमचे महाविद्यालय नेहमीच समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मदतीला सदैव तत्पर असेल असे आश्वासन दिले."
सदर कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे...
कौटूंबिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या महिला सेवाव्रतींना 'मातोश्री पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये डॉ. सुलभा दिलीप देशमुख, धाराशिव (माजी प्राचार्य), डॉ. रेखा अनिल ढगे, (कवयित्री) धारशिव, तृप्ती जगदिश काटकर, कोल्हापूर यांचा समावेश होता. तर सुरभी बी. के. (गीतकार) वडगांव सिध्देश्वर, धाराशिव यांना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले.
सदर संमेलनात 'आई' विषयावर घेतलेले कवी संमेलन अतिशय रंगतदार झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजी गायकवाड होते. प्रमुख पाहूणे डॉ. रेखा ढगे आणि अरविंद हंगरगेकर होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. गायकवाड यांनी आपल्या कवितेतून आई विषय मांडला. गेल्या चार वर्षापासून चालू असलेल्या आई एक महाकाव्य व आई समजून घेतांना कार्यक्रमासाठी आयोजकांचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.
कविसंमेलनामध्ये डॉ. मधुकर हुजरे, धाराशिव, नागोराव सोनकुसरे, नागपुर, रुपेशकुमार जावळे, सुरभी भोजने वडगांव (सिध्देश्वर), गणेश मगर वाघोली, बाळासाहेब मगर धाराशिव, महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिवानी जगताप, स्नेहल जाधव, निकिता घुगे, निकिता जाधव, प्रज्ञा सुरवसे यांनी कविता सादर केल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. संतोष पवार आणि डॉ. सचिन देवव्दारे यांनी केले. तर आभार डॉ. तुळशिराम दबडे व डॉ. लक्ष्मण थिट्टे यांनी मानले.
आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या कल्पक कार्यक्रमाचे आयोजन रमेशराव पुदाले, सुनील उकंडे, कविता पुदाले, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. रुपेशकुमार जावळे, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. डी. जी. जाधव, डॉ. एच. एम. मिर्झा, डॉ. पी. एस. गायकवाड, प्रा. अशिष हंगरगेकर, डॉ. संतोष पवार व सर्व सदस्य माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान, नळदुर्ग यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्दु सुतार, सचिदानंद घुगे, भागीनाथ बनसोड, दतात्रय कांबळे, मधुकर माने, सचिन गायकवाड, भिमराव गवारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.