श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील श्रीमती शितलताई गोरे यांची निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रीमती गोरे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्याकडे श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली.
श्रीरामपूर येथील नियोजित कार्यक्रमात सहाय्यक निबंधक अधिकारी यांना श्री.भावे यांनी जाब विचारला. बँका, पतसंस्था, फायनान्स कंपनी, आरबीआय मार्फत योग्य ती कारवाई करून श्रीरामपूर तालुक्यातील खासगी सावकारी करणाऱ्या व्यावसायिकांच्या माध्यमातून आत्महत्येचे प्रमाण वाढले, यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तसेच फायनान्स कंपनीची दादागिरी आणि गुंडागर्दी फोकावत असल्याचे ते म्हणाले.
तसेच यावेळी विधवा, निराधार,गरजू महिलांच्या सशक्तिकरणासाठी श्रीरामपूर तालुकास्तरीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी श्रीमती शितल गोरे यांनी विशेष योगदान दिल्याने त्यांच्या माध्यमातून पतसंस्था, बँका, शासकिय कार्यालय आदि ठिकाणी जनजागृती सुरू असुन यापुढे ग्रामीण, शहरी भागातील खासगी सावकारकी तसेच दुध भेसळ किंवा नागरीकांच्या विविध प्रकारच्या समस्या अडी अडचणी असल्यास संपर्क करण्याचे आवाहानही करण्यात आलेले आहे.
श्रीरामपूर तालुका अध्यक्ष म्हणून शितल गोरे यांची निवड केली असल्याने त्यांना सर्वांनी सहकार्य करावे असेही जितेंद्र भावे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमांचे आयोजन श्रीमती शितल गोरे यांनी केले या कार्यक्रमासाठी नाशिक येथील कार्यकर्ते, भैरवनाथनगरचे सरपंच प्रवीण फरगडे, मालुंजा येथील सरपंच अच्यूत बडाख, पत्रकार विजयाताई बारसे, भारती वाणी, उषा साळुंखे, श्री.कणगरे जामखेड तालुका प्रहार जनशक्ती तालुका अध्यक्ष नयुमभाई सुभेदार, सतीश देशमुख तसेच सर्व अन्यायग्रस्त, ठेवीदार, नरहरी पतसंस्था, चौंडेश्वरी पतसंस्था, ज्ञानराधा पतसंस्था आदिचे ठेवीदार तसेच नवनाथ खटाने, योगेश सातपुते,निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्व पदाधिकारी आदि. उपस्थित होते.आभार नयुमभाई सुभेदार यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
(वडाळा महादेव)
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111