पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) आयोजित व्याख्यानमाला आणि संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलन संपन्न
धुळे - मोहाडी प्र.डांगरी / प्रतिनिधी:
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमीत्ताने संविधान व सामाजिक परिवर्तनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना, " गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे. कोणताही भेदभाव न करता संविधानाने सर्व सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर विराज मान झाला आहे. ही किमया भारतीय संविधानाची आहे. आज संविधानाच्या अमृत महोत्सवादिनानिमित्ताने व्याख्यानमाला, कवी संमेलन, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा, संविधान उद्देशिका घराघरात अशा छान उपक्रमा बरोबर संविधानाची जनजागृती प्रसार आणि प्राचार , शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांनी स्वतःच्या मोहाडी प्र. डांगरी या आपल्या गावात राबवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
मुंबईला गेल्यावर लोकं गाव विसरतात पण शाम बैसाणे गावाला विसरले नाहीत. गावात छान उपक्रम त्यांनी घेतला आहे. सामजिक कार्य ते चांगले करीत आहेत. आज काल लोकं कौतुक करीत नाहीत पण बैसाणे यांनी चांगली भूमिका घेऊन गावात चांगले कार्य करणाऱ्या गावातील मान्यवरांचा आणि विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला आहे." असे प्रतिपादन केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पांचपीर ट्रस्ट (मोहाडी), कार्यक्षेत्र भारत आयोजित व्याख्यानमाला बारकु काळू खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलन जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली व शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
व्याख्यानमालिकेत वक्ते ॲड. नाना अहिरे (प्रसिद्ध वकील आणि समाजसेवक) यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य , वक्ते पिंटू धनगर (माजी सरपंच) यांनी फुले शाहू आंबेडकर आणि मानवतावादी चळवळ, आणि वक्ते बाळासाहेब शंकर बैसाणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान, या विषयानुसार मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले तर दुसऱ्या सत्रात संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलनामध्ये अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे (कल्याण) सहभागी निमंत्रित कवी भटू जगदेव (भिवंडी), मास्टर राजरत्न राजगुरू ( बदलापूर ), अजय भामरे (अमळनेर), शरद धनगर (अमळनेर), शाम बैसाणे ( मोहाडी ), डॉ. सुशील बैसाणे ( मोहाडी), साक्षी खैरनार ( धुळे), पल्लवी चौधरी (मोहाडी ) आदी विषयानुरूप कविता सादर करून सामजिक प्रबोधन केले. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अहिराणी बोलीभाषेतील प्रसिध्द कवी शरद धनगर यांनी केले. मराठी भाषेसह अहिराणी बोली भाषेतील कविता , गजल , लोकगीते सादर करून उपस्थित गावकरी समाज बांधवांचे प्रबोधन केले.
कवी संमेलनाच्या निमंत्रीत कविंच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या बरोबरच दहावी आणि बारावी मध्ये गावात प्रथम, दुतिय आणि तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मुला - मुलींचा सन्मानपत्र , संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन कौतुक सोहळा संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रतन मोरे, महेश चौधरी, डॉ. सुशिल बैसाणे, (कार्याध्यक्ष पांचपीर ट्रस्ट मोहाडी) ,ॲड नाना अहिरे (सचिव पांचपीर ट्रस्ट मोहाडी), श्रावण अहिरे, तुषार पाटील , सुशीलाताई सोनवणे, विलास गुजर, सुनील पाटील, भाऊराव बैसाणे, हुकूमचंद गुजर, संतोष बिऱ्हाडे, पिंटू धनगर, नाना चौधरी, सागर आखाडे, जगदीश खैरनार, आशाबाई खैरनार, योगिता खैरनार, दिपाली खैरनार, योगेश बैसाणे, राहुल बैसाणे, बाळू बैसाणे, किशोर पवार, मोनू अहिरे, माया अहिरे, प्रकाश बैसाणे, रहीम खाटीक, राजू सोनवणे, आबा माळी, अमृत भोई, सागर बैसाणे, हिम्मत पाटील, महेश चौधरी, पवन बैसाणे, अशोक धनगर, अरुण जैन, गोरख भोई, कैलास पवार, शालिक चित्ते , कैलास चित्ते , आनंदा हरी बैसाणे, मनोज चित्ते, युवराज माळी, हर्षवर्धन बसाणे, आदी सह गावातील ग्रामस्थ होते.
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111