एरंडोल:- येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) एककाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची 428 वी आणि स्वामी विवेकानंद यांची 162 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अमित दादा पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अरविंद बडगुजर, माजी प्रभारी प्राचार्य प्रा. एन. ए. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. एस. पाटील यांनी प्रतिमांचे पूजन केले आणि आपल्या भाषणांमधून समाजासाठी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात प्रा. सागर विसपुते, प्रा. उमेश सूर्यवंशी, डॉ. नरेंद्र तायडे, श्री. सुनील पाटील, श्री. दिनेश पवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय गाढे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश येंडाईत यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचे मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांना समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याची शिकवण मिळावी, हा होता.अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे युवकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि समाजप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यास मदत होते.