एरंडोल:- शासकीय कामात दिरंगाई केल्यामुळे संबंधित लिपिकाच्या (नितीन रघुनाथ पाटील) सेवापुस्तकात सक्त ताकीद नोंदविण्याचा आदेश देण्यात आला आहे.
एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजधर महाजन यांनी मागितलेल्या माहितीच्या संदर्भात अपूर्ण माहिती देणे आणि त्यानंतर प्रथम व द्वितीय अपील प्रक्रियेत योग्य ती कार्यवाही न करणे यामुळे राज्य माहिती आयोगाने हस्तक्षेप केला.
राज्य माहिती आयोगाने दिलेल्या आदेशांनुसार, चौकशीअंती प्रथम अपिलीय अधिकारी एस.वाय. शेख व संबंधित लिपिक नितीन पाटील यांच्या शासकीय कामात दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईचा मुख्य उद्देश शासकीय कामात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आहे.
त्यानुसार...
- लिपिक नितीन पाटील यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला.
- त्यांच्या सेवा पुस्तिकेत ताकीद नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.
- हे आदेश विभागीय वन अधिकारी आणि प्रधान मुख्य वन रक्षकांच्या शिफारशीनुसार देण्यात आले.
ही कारवाई इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी धडा ठरेल आणि माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीस अधिक बळकटी मिळेल.