महाराष्ट्रातील मराठवाड्यात शेजारी दोन जिल्ह्यात दोन तरुणांचे अतिशय क्रुर पद्धतीने एकाच वेळी खुन करण्यात आले...!!
एक सरपंच होता तर दुसरा कायद्याचे शिक्षण घेणारा उच्च शिक्षित ऊमदा तरुण होता.त्याचीही निर्घृण व अमानुषपणे हत्याच झाली. विशेष म्हणजे तो कायद्याचे शिक्षण घेत होता.आणि आम्ही असं मानतो दोन्ही माणसंच होती. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणून संबधित सर्वच संस्था तथा लोकप्रतिनिधी यांनी मानवीयतेने वागणे ही अपेक्षा होती...!!
सरपंच असलेल्या तरुणाच्या खुन्यांना पकडले पाहिजे, शिवाय शोधून काढले पाहिजे म्हणून विधानसभा, संसदेत लोकप्रतिनिधी मार्फत तासनतास आवाज उठविला गेला. सभागृह डोक्यावर घेतले ते आमदार,खासदार उभ्या महाराष्ट्राने बघितले. पुरोगामी महाराष्ट्रातील आमदार, खासदारांनो दुसऱ्या खुनासाठी अर्थात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेक-यांना पकडण्यासाठी तुम्हाला आवाज का ऊठविता आला नाही.? तो माणूस नाही का? खरचं तुम्ही पुरोगामी राज्यातील लोकप्रतिनिधी आहात की, जातियवादी सरंजामी मानसिकतेचे लोकप्रतिनिधी आहात...??
दोन खुनातील पिडितांना तुम्ही माणूस समजण्याऐवजी,भेद केला. त्यांना जातीच्या चष्म्यातून बघितले आणि त्याप्रमाणे तुमची कृती घडली हे सिद्ध झाले आहे आणि म्हणून तुम्हाला पुरोगामी म्हणतांना लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही पुरोगामी नाही. आणि तुम्ही महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधी असल्याने महाराष्ट्र राज्य सुद्धा पुरोगामी नाही हे तुमच्या कृतीतून तुम्ही सिद्ध केले आहे.तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या पुरोगामी छबीला बट्टा लावला आहे....!!
पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, सेक्युलर कॉंग्रेस पक्षाचे आमदार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात अतिशय आक्रमक भूमिका घेऊन मारेक-यांना पकडण्यासाठी न्याय मागण्यासाठी पुढे सरसावले तसे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेक-यांना पकडण्यासाठी पुढे आले नाही. तोंडदेखली भाषा वापरुन चिडी चूप बसले यावरून हेच सिद्ध झाले की, तुम्ही पुरोगामी नाही तर पक्के जातियवादी सरंजामी वृत्तीचे आहात. मते मागतांना पुरोगामी आणि, सेक्युलर असता आणि न्याय मागतांना जातियवादी बनता, जात पाहून वर्तन करता,जातीभेद करता हा तुमचा मुखवटा ऊघडं झाला आहे आणि म्हणून यापुढे तुम्हाला पुरोगामी म्हणतांना लाजा वाटल्या पाहिजे....!!
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या मिडियाला संतोष देशमुख यांच्या मुलीची रडतानाची छबी महाराष्ट्राला दाखवता आली.ठिक आहे ते दाखवायलाच पाहीजे...,ते योग्यच आहे. मात्र सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई मुलगा गेल्यापासून आजही तीने अन्न त्याग केला आहे.अश्रु ढाळत आहे. तीचा आक्रोश दाखवण्यात का संकोच वाटला. हे कदापिही योग्य नाही.मिडीया ही न्याय देणारी यंत्रणा आहे.सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी मिडीयाने सतत प्रयत्न करणे गरजेचे असते..तरच मिडीयाला महत्व राहील.. अन्यथा नाही..!!
सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येने हे सिद्ध केले आहे की,महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य नसुन हे जातियवादी लोकांचं प्रतिगामी राज्य आहे. इथं कायद्याचे राज्य नसुन जातियवादी सरंजामी वृत्तीच्या लोकांचे टोळी राज्य आहे....!!
राजकीय नेते,आमदार,खासदार अरे तुम्ही मोठ्या ऊच्चारवाणे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र,पुरोगामी महाराष्ट्र म्हणून भाषणे ठोकता आणि आंबेडकरी समुहाची मते घेता मात्र तुमची कृती अतिशय जातियवादी,आणि वृत्ती प्रतिगामी आहे हे सिद्ध झाले आहे म्हणून आता तुम्हाला महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतांना लाजा वाटल्या पाहिजे....!!
लोकशाही प्रजासत्ताक शासन प्रकार असतांना महाराष्ट्रातील मनुवादी सरकारने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात, पोलीस चौकशी,सीआयडी चौकशी, एस आयटी समीती स्थापन करून आम्ही न्यायासाठी कटीबद्ध आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालविला मात्र सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्ये संदर्भात कुठलाच पवित्रा घेतला नाही.? असे का.? तुमच्या लेखी संतोष देशमुख सारखाच सोमनाथ सुर्यवंशी हा माणूस नव्हता का.?
लोकशाही वाचविण्यासाठी महाराष्ट्र भर निर्भय बनो म्हणून तोंडाचा पट्टा चालविणारे पुरोगामी पत्रकार, संपादक,समाज सुधारक, लेखक, पट्टीचे वकील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येपासुन चिडीचूप आहेत. मविआ सारख्या सरंजामी वृत्तीच्या राजकीय पक्षांसाठी मते मागतांना हे पुरोगामी बनतात आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्याय मागायच्या वेळी यांची दातखिळी बसते. म्हणून निर्भय वाल्यांनो तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतांना लाजा वाटल्या पाहिजे....!!
ढोंगी पुरोगामी नेते आणि राजकीय पक्ष, बुरखाधारी सेक्युलर राजकीय पक्ष आणि नेते, समाजसेवक. आणि फुले शाहू आंबेडकरांचं नांव घेऊन उपेक्षित समुहाची फसवणूक करणाऱ्या सगळ्या बगळ्यांना आता महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतांना लाजा वाटल्या पाहिजे हेच सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येवरुन सिद्ध झाले आहे....!!
महाराष्ट्र हि साधुसंताची भूमी आहे .. त्यांचे विचारांची पायमल्ली होत आहे. हे महाराष्ट्